शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गॅस सिलिंडरचा तुटवडा; आॅनलाईन नंबर लावूनही मिळेना

By admin | Updated: February 16, 2017 00:01 IST

आखाती देशातून गॅस आयातीत अडचणी निर्माण होत असल्याने मागील १५ दिवसांपासून ग्राहकांना सिलिंडरसाठी पायपीट करावी लागत आहे.

अमरावती : आखाती देशातून गॅस आयातीत अडचणी निर्माण होत असल्याने मागील १५ दिवसांपासून ग्राहकांना सिलिंडरसाठी पायपीट करावी लागत आहे. वितरकांकडे मागणी वाढली असून गॅस कंपन्यांकडून मात्र अत्यल्प प्रमाणात पुरवठा होत आहे.गॅस सिलिंडर संपले की गृहिणींची तारांबळ उडते. जिल्हाभरात अलिकडे नेमकी हिच स्थिती निर्माण झाली आहे. शहरात दर महिन्याला दीड लाख गॅस सिलिंडर्सची मागणी आहे. त्यातुलनेत गॅस कंपन्यांकडून २५ टक्केच सिलिंडरचा पुरवठा केला जात आहे. गॅस एजन्सींकडे चार ते पाच दिवस आधी आॅनलाईन मागणी करूनही वेळेवर सिलिंडर मिळत नसल्याची ओरड आहे. यावर्षी थंडी अधिक पडल्याने गॅसचा वापरही वाढला. परिणामी मागणीत वाढ झाली. घरगुती अथवा व्यावसायिक वापराचा गॅस आखाती देशातून जहाजाने बंदरावर आयात केला जातो. आखाती देशातून जहाजाद्वारे आणला जाणारा पुढे गॅस टँकरद्वारे रिफिलिंग प्लँटमध्ये येतो. त्यानंतर यागॅसवर प्रक्रिया करून त्याचे सिलिंडरमध्ये रिफिलिंग होते. मात्र, अलिकडे आखाती देशातून जहाजाने आयात होणारा जळाऊ गॅस उशिरा येत आहे. त्यामुळे रिफिलिंग प्लँटमध्ये आवक कमी झाली आहे. परिणामी सिलिंडरचा तुटवडा हल्ली पश्चिम व उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याची माहिती आहे. परंतु ज्या कुटुंबाकडे एकच सिलिंडर आहे, अशा कुटुंबांना वेळीच गॅस मिळत नसल्याने त्यांना स्टोव्ह अथवा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. महानगरातील वितरकांनी गॅस कंपन्यांकडे सिलिंडरची मागणी केली असताना त्यांना गॅस सिलिंडरचा पुरवठा होत नाही. दुसरीकडे सिलिंडरसाठी ग्राहकांची ओरड सुरु आहे. गॅसविक्रेत्यांच्या गोदामात ठणठणाट दिसून येत आहे. गॅस एजन्सी कार्यालयात सिलिंडरच्या मागणीसाठी झुंबड उडाल्याचे चित्र आहे. ऐन महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या काळात अचानक गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवू लागल्याने गृहिणींना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागतोय. जिल्हा प्रशासनाने नियमित गॅस पुरवठ्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. सिलिंडर तुटवड्याबाबत अतिरिक्त जिल्हाधिकारी के.आर.परदेशी यांचेशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. मात्र सिलिंडरच्या टंचाईमुळे असंतोषाचा भडका उडण्यापूर्वी स्थिती हाताळणे गरजेचे असल्याचे दिसते. तीन ते चार दिवसांत गॅस सिलिंडर वितरणाची परिस्थिती सुधारण्याचे संकेत आहेत. आखाती देशातून गॅसच्या आयातीत अडचणी येत असल्याने गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे.- संजय देशमुख, वितरक, अमरावती.चार दिवसांपूर्वी सिलिंडरची आॅनलाईन मागणी करण्यात आली आहे. मात्र अद्यापही सिलिंडर मिळाले नाही. उद्भवलेल्या सिलिंडर तुटवड्याचा गृहिणींना प्रचंड त्रास आहे.-प्रगती बांबोडे, गृहिणी, बिच्छू टेकडी