शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे; ५ जुलैला होणारा ठाकरे बंधुंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

गटनेत्यांच्या वाहन सुविधेवर येणार गंडांतर?

By admin | Updated: May 4, 2015 00:23 IST

महापालिकेत गटनेता पदाला सुविधा पुरविण्याबाबतच्या घटनात्मक अधिकाराची चाचपणी आयुक्तांनी सुरु केली आहे.

आयुक्तांची चाचपणी : केबीन कायम पण, सुविधा गोठविणारअमरावती : महापालिकेत गटनेता पदाला सुविधा पुरविण्याबाबतच्या घटनात्मक अधिकाराची चाचपणी आयुक्तांनी सुरु केली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात वाहन सुविधा गोठविण्याच्या निर्णयावर ते पोहोचले आहेत. परिणामी गटनेत्यांना दिली जाणारी वाहन सुविधांना ‘ब्रेक’ लागेल, असे संकेत आहे.आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी पदाची सूत्रे स्वीकारताच त्यांच्या आगळ्या-वेगळ्या कार्यशैलीने पदाधिकारी, सदस्य कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. दुसरीकडे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा ‘बीपी’ वाढत चालला आहे. उत्पन्नवाढीचे उद्दिष्ट पूर्ण करताना अवास्तव खर्चाला लगाम कसा लागेल, याची चाचपणी करताना आयुक्त गुडेवार यांनी गटनेत्यांच्या सुविधांवर बोट ठेवले आहे. महापालिकेत महापौर, पक्षनेता, विरोधीपक्षनेता याच पदांना घटनात्मक अधिकार प्रदान करण्यात आले आहे. गटनेता हे त्या गटाचे कामकाज बघतात. गटनेतापदाला सुविधा पुरविण्यात याव्यात, असे कोठेही प्रशासनाला बंधन नाही. तरीदेखील स्थानिक राजकारण सुरक्षित ठेवण्यासाठी गटनेतापदाला सुविधा देण्याचा निर्णय सभागृहात घेण्यात आल्याची माहिती आहे. मुंबई महापालिका अधिनियमात गटनेतापदाला सुविधा पुरविण्याचा उल्लेख नसल्याची माहिती आहे. केवळ गटनेत्यांना केबीन उपलब्ध करुन द्यावे, हे अपेक्षित आहे. त्यामुळे येत्या काळात राष्ट्रवादी फ्रंटचे अविनाश मार्डीकर, जनविकास- रिपाइं फ्रंटचे प्र्रकाश बनसोड, भाजपचे संजय अग्रवाल व बसपाच्या गुंफाबाई मेश्राम यांना पुरविली जाणारी वाहन सुविधा काढल्यास काही वावगे ठरणार नाही.गटनेत्यांना वाहन सुविधा पुरविण्याचा कोठेही उल्लेख नाही. यापूर्वी सभागृहात झालेल्या निर्णयानुसार आतापर्यंत कारभार सुरु आहे. नियमानुसार पदाधिकाऱ्यांना सोई, सुविधा मिळाल्याच पाहिजे. अवांतर खर्चावर अंकुश लावणे हे कर्तव्यच आहे. नियमात जे काही आहे, त्यानुसार कार्यवाही होईल.- चंद्रकांत गुडेवार,आयुक्त, महापालिका.गटनेत्यांच्या वाहन सुविधांवरच गंडांतर का? अधिकाऱ्यांना दिली जाणारी कंत्राटी वाहन सुविधा काढून घ्यावी. बहुतांश अधिकाऱ्यांकडे स्वत:ची वाहने आहेत. वेतनाची आकडेवारी बऱ्यापैकी आहे. त्यामुळे महापालिकेत सेवा देताना वाहन सुविधा घेऊ नये. कारभार नियमानुसार चालला पाहिजे.- संजय अग्रवाल,गटनेता, भाजप.