शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

बजरंग टेकडीतील अतिक्रमणावर गजराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 22:09 IST

राजापेठ बसस्थानकामागे असलेल्या बजरंग टेकडी भागातील अतिक्रमण शुक्रवारी जमीनदोस्त करण्यात आले. महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथकप्रमुख गणेश कुत्तरमारे यांच्या नेतृत्वात ही व्यापक कारवाई करण्यात आली.

ठळक मुद्देपथकाविरुद्ध रोष : झोपड्यांसह पक्के बांधकाम तोडले

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राजापेठ बसस्थानकामागे असलेल्या बजरंग टेकडी भागातील अतिक्रमण शुक्रवारी जमीनदोस्त करण्यात आले. महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथकप्रमुख गणेश कुत्तरमारे यांच्या नेतृत्वात ही व्यापक कारवाई करण्यात आली.बालाजी प्लॉटलगत असलेल्या बजरंग टेकडी भागात अनेक जणांनी नझूलच्या जागेवर अतिक्रमण करुन झोपड्या बांधल्या आहेत, तर नवनीत चांडक नामक इसमाने तेथे टिनशेड व अन्य बांधकाम केले होते. या झोपड्यांसह चांडक यांनी बांधलेले टिनशेड व २ दुकाने व एक गॅरेज असे ४ हजार चौरस फुटाचे बांधकाम जमीनदोस्त करण्यात आली, तर सात झोपड्यांवर गजराज फिरविण्यात आला. शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. अतिक्रमण निर्मूलन कारवाई करतेवेळी अतिक्रमणधारकांनी जोरकस विरोध केला. मात्र, त्या विरोधाला भीक न घालता कुत्तरमारे आणि त्यांच्या पथकाने अतिक्रमण उद्ध्वस्त केले. मागील अनेक वर्षांपासून या भागात झोपड्या थाटून काहींनी अतिक्रमण केले होते. पोलीस विभागाची या कारवाईसाठी मदत घेण्यात आली. हे अतिक्रमण हटविण्यासाठी येथील नागरिकांनी महापालिकेशी बरेचदा पत्रव्यवहार केला होता. त्याअनुषंगाने ही व्यापक कारवाई करण्यात आली. या कारवाईसोबतच इतवारा बाजार व रात्री होणाऱ्या अतिक्रमणावर लवकरच मोठी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती कुत्तरमारे यांनी दिली.शहराच्या अनेक भागात रात्री हातगाडी व अन्नपदार्थ विकणाºयांचे अतिक्रमण वाढले आहे.