शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

गडकरी, फडणवीस रोज यावेत..

By admin | Updated: December 27, 2015 00:26 IST

गेल्या दोन दिवसांपासून शहरातील विविध कानाकोपऱ्यात सुरू असलेली स्वच्छता मोहीम, रस्त्यांचे रुंदीकरण, गतिरोधकांचे सपाटीकरणासह विविध कामे युध्दस्तरावर सुरू आहेत.

अमरावती चकाकली : मंत्र्यांचा दौरा अन् डागडुजी सुरूअमरावती : गेल्या दोन दिवसांपासून शहरातील विविध कानाकोपऱ्यात सुरू असलेली स्वच्छता मोहीम, रस्त्यांचे रुंदीकरण, गतिरोधकांचे सपाटीकरणासह विविध कामे युध्दस्तरावर सुरू आहेत. नागरिक व लोकप्रतिनिधींकडून वारंवार पाठपुरावा करूनही या कामांना मुहूर्त मिळत नव्हता. मात्र, केंद्रातील ज्येष्ठ मंत्र्यांसोबत राज्याचे मुख्यमंत्री येत असल्याने संबंधित विभागाला खडबडून जाग आली आहे. या दोन नेत्यांच्या रविवारच्या दौऱ्यांच्या पार्श्वभूमिवर अमरावतीला चकाकी आली आहे. शासकीय अधिकाऱ्यांना एकाऐकी सुचलेले हे शहाणपण पाहता गडकरी, फडणवीस रोजच यावेत, अशी अपेक्षा अमरावतीकर व्यक्त करीत आहेत. जिल्ह्यातील विविध बांधकामाच्या भूमिपूजनासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी येथील दसरा मैदानावर येत आहेत. त्यांच्या हस्ते सुमारे ९ हजार कोटी रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन होत असल्याचा दावा भाजप नेत्यांकडून केला जात आहे. शहरातील प्रत्येक रस्त्यावर गडकरी, फडणवीस या जोडगोळीची मोठमोठी फलके लागली आहेत. त्या अनुषंगाने महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग या प्रमुख विभागासह अन्य संबंधित विभाग जागे झाले आहे. अवघ्या दोन दिवसांमध्ये शहरातील अतिक्रमणही हटविण्यात आले आहे. प्रमुख रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंग व वाहतूक नियम दर्शक पट्टे मारण्यात आलेत. वाहतूक नियमनासाठी महापालिकेने नियम दर्शक पट्टे अंकित करून द्यावेत, अशी मागणी वाहतूक शाखेने कित्येक दिवसांपासून महापालिका प्रशासनाकडे लावून धरली होती. मात्र त्याला केराची टोपली दाखविण्यात आली. तथापि, नऊ हजार कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यासाठी केंद्रातील वजनदार मंत्री गडकरी आणि दस्तुरखुद्द मुख्यमंत्री येत असल्याने सारेच अधिकारी कर्मचारी झाडून कामाला लागले आहेत. कधी नव्हे ते दोन्ही उड्डाण पुलावर केरकचरा गोळा करून उड्डाण पुल स्वच्छ करण्यात आला. याशिवाय दुभाजकावरील कचरा कुंडी गेल्या दोन वर्षांपासून भग्नावस्थेत होत्या. त्यासाठी मोठी ओरडही होत होती. गडकरी, फडणवीस येण्याची वर्दी मिळताच प्रशासनाची सूत्रे हलली आणि रात्र, दोन रात्रीतच लक्षावधी रुपयांची तरतूद करून शहर चकाचक करण्यात आले. आपली पाठ थोपटून घेण्यासाठी शासकीय यंत्रणेत जणू काही स्पर्धा लागल्याचे चित्र दिसून येत होते. (प्रतिनिधी)