शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण समृद्धी योजनेसाठी पावणेदोन कोटींचा निधी

By admin | Updated: January 25, 2015 23:06 IST

ग्रामीण भागात पर्यावरण संवर्धन व विकास घडवून आणण्यासाठी शासनाच्यावतीने पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत तीन टप्प्यात गावांचा विकास साधला जातो.

जितेंद्र दखणे - अमरावतीग्रामीण भागात पर्यावरण संवर्धन व विकास घडवून आणण्यासाठी शासनाच्यावतीने पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत तीन टप्प्यात गावांचा विकास साधला जातो. ज्या गावांनी विकासात सातत्य ठेवले आहे अशाच गावांना तीन टप्प्यात पात्र ठरविण्यात येते. जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यात १३ गावे पात्र ठरली आहेत. या गावांना विकासासाठी १ कोटी ७० लाख २८ हजार रूपये लवकरच प्रदान केले जाणार आहेत.आधुनिकीकरणामुळे शहरासह ग्रामीण भागात झपाट्याने पर्यावरणाचा ऱ्हास होऊ लागला आहे. त्यामुळे वातावरणाचा समतोल ढासळत आहे. ग्रामीण भागात पर्यावरणाचे संवर्धन, जतन, संरक्षण व्हावे. यातून समृद्ध गाव विकसित व्हावे, गावात पाणी, जमीन, हवा, वनस्पती यांचे योग्य व्यवस्थापन व्हावे, गावातील नागरिकांचे राहणीमान त्यांचा दर्जा सुधारावा यासाठी शासनाच्यावतीने प्रयत्न केले जात आहेत. या बाबींची पूर्तता करणाऱ्या गावांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत प्रामुख्याने गावातील रोपवाटिका व संवर्धन, स्वच्छता, सांडपाण्याचे व्यवस्थापन, जलनिस्सारण, गटारे, रस्त्यावरील दिवाबत्ती, सौर पथदिवे, अपारंपारिक ऊर्जा, विकासाचा वापर आदी कामांना प्राधान्य देण्यात आले. ही योजना तीन टप्प्यात राबविण्यात येते. पहिल्या टप्प्यातील निकष पूर्ण करणाऱ्या गावांची निवड दुसऱ्या टप्प्यात केली जाते. दुसऱ्या टप्प्यातील निकष पूर्ण करणाऱ्या गावांची निवड तिसऱ्या टप्प्यात केली जाते. निकषाचे पालन करणाऱ्या ग्रामपंचायतींना दरवर्षी निधी लोकसंख्येच्या आधारावर दिला जातो. (प्रतिनिधी)