वरूड : अपंगांना स्वतःचे पायावर उभे राहता यावे म्हणून शालिनी गंगाधर काठीवाले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मुंबईच्या रत्ना निधी फाऊंडेशन, विदर्भ प्रेस क्लब आणि सार फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक माधवराव काठीवाले सभागृहात मोफत कृत्रिम अवयव शिबिर पार पडले. यात विदर्भातून आलेल्या ४० अपंग व्यक्तीच्या पायाचे, हाताचे मोजमाप घेण्यात आले.
शिबिराच्या अध्यक्षस्थानी डॉ.मनोहर आंडे, प्रमुख अतिथी म्हणून शेंदूरजनाघाटचे ठाणेदार श्रीराम गेडाम, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. महेंद्र राऊत, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद पोतदार, सामाजिक कार्यकर्ते मनोहर ब्राम्हणे मुंबई, विदर्भ प्रेस क्लबचे जिल्हाध्यक्ष संजय खासबागे, उपाध्यक्ष अतुल काळे, तालुकाध्यक्ष योगेश ठाकरे, प्रकाश गडवे, स्वप्निल आजनकर, मंगेश काठीवाले, सार फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनील सावरकर, बाळासाहेब मगर्दे, महेश पुरोहित, अविनाश बनसोड आदी उपस्थित होते. हातपाय नसलेल्या दिव्यांगांकरिता मोफत कृत्रिम अवयव शिबिर घेण्यात आले. यात ४० रुग्णांची नोंदणी करून हात-पायाचे मोजमाप दिले. याकरिता मुंबईचे पथक आले होते. यामध्ये मुंबई आणि जयपूर पॅटर्ननुसार कृत्रिम अवयव देण्यात येणार असून २६ नोव्हेंबरला ते अवयव वितरण करण्यात येणार आहे. तसेच पोलिओग्रस्ताना काठ्या, वाकरसुद्धा देण्यात येणार आहे.