शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ चार विद्यार्थ्यांनी रचला अपहरणाचा बनाव

By admin | Updated: December 31, 2016 01:22 IST

सकाळच्या सुमारास शाळेला जात असताना चारचाकी वाहनातून आलेल्या सहा व्यक्तींनी आपले

भाजीबाजार परिसरातील घटना : पालकांनी केला खुलासा अमरावती : सकाळच्या सुमारास शाळेला जात असताना चारचाकी वाहनातून आलेल्या सहा व्यक्तींनी आपले अपहरण केले, मात्र, त्यांच्या हाताला चावा घेत आपण कशीबशी सुटका करून घेतल्याचे शाळकरी मुलांनी सांगताच एकच खळबळ माजली. या शाळकरी मुलांनी हा प्रकार मुख्याध्यापकांच्या कानावर घातला. पुढे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहचले. मात्र, काही वेळात हा सर्व बनाव असल्याचे उघड झाले. शाळेला दांडी मारता यावी, या उद्देशाने आपण अपहरणाचा बनाव रचल्याचे त्या मुलांनी सांगताच पोलिसांचा जीव भांड्यात पडला. मात्र, त्याचवेळी इतक्या लहानवयात या मुलांनी स्वताच्याच अपहरणाचा बनाव रचल्याने पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आश्चर्य व्यक्त केले. भाजीबाजार परिसरात महापालिकेची उच्च प्राथमिक हिन्दी व इंग्रजी शाळा क्रमांक ११ आहे. या शाळेत पहिली ते पाचवी पर्यंतचे वर्ग आहेत. या शाळेचे दुपारचे सत्र १२ वाजताच्या सुमारास सुरु होते. याच शाळेत शिकणारे हाथीपुरा येथील चार मुले शुक्रवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास भाजीबाजार स्थित मुरलीधर मंदिराजवळील मार्गाने शाळेकडे येत होते. दरम्यान पिवळ्या व लाल रंगाची व्हॅन मंदिराजवळ अचानक थांबली. त्यातून सहा बुरखाधारी अपहरणकर्ते बाहेर आले. त्यांनी आपले तोंड दाबून अपहरण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आम्हा चौघांनाही बंदीस्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या हाताला चावा घेत आपण कशीबशी सुटका करून घेतली व तेथून पळ काढला, अशी आपबिती या चार विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक गोपाल कांबळे यांच्याकडे विशद केली. या घटनेचे गांभीर्य बघता मुख्याध्यापक व पालकांनी तत्काळ खोलापुरी गेट पोलीस ठाणे गाठले. तथा अपहरणाची माहिती पोलीस निरीक्षक कुरुळकर यांना दिल्याचे कांबळे यांनी सांगितले. पोलीस, पालक, मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांसह घटनास्थळ गाठले. पोलिसांनी या परिसरातील सिसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची पाहणी केली. तथा चौकशीला वेग दिला. दरम्यान त्या चारही विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत पाठविण्यात आले. तेथे मुख्याध्यापक गोपाल कांबळे यांनी या चौघांना विश्वासात घेऊन त्यांची उलटतपासणी घेतली. उलटतपासणीमध्ये या चारही शाळकरी विद्यार्थ्यांनी अपहरणाचा कुठलाही प्रयत्न झाला नसल्याचे सांगितले. टीव्ही सिरीयल पाहून आपल्याला अपहरणाची कल्पना सुचल्याचे एका विद्यार्थ्याने कांबळे यांना सांगितले. त्यानंतर हा सर्व बनाव उघड झाला. (प्रतिनिधी)