शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

गजभियेच्या मागावर पोलिसांची चार पथके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 00:44 IST

सामाजिक कार्यकर्त्या शीतल पाटील हत्याकांडातील आरोपी सुनील गजभिये व रहमानखां पठाणला अटक करण्यासाठी गाडगेनगरसह गुन्हे शाखेची चार पथके कामी लागली आहेत.

ठळक मुद्देगुंता कायम : सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू

आॅनलाईन लोकमतअमरावती : सामाजिक कार्यकर्त्या शीतल पाटील हत्याकांडातील आरोपी सुनील गजभिये व रहमानखां पठाणला अटक करण्यासाठी गाडगेनगरसह गुन्हे शाखेची चार पथके कामी लागली आहेत.पोलिसांनी इर्विन चौक ते कॅम्प मार्गावरील काही प्रतिष्ठानांतील सीसीटीव्ही फुटेजची तपासणीसुद्धा केली. मात्र, अद्याप दोन्ही आरोपींचा पोलिसांना सुगावा लागला नाही. मात्र, लवकरच दोन्ही आरोपींना अटक केली जाणार असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.शीतल पाटील यांचा मृतदेह शुक्रवारी विहिरीत आढळल्यानंतर नातेवाइकांनी सुनील गजभियेसह त्याच्या साथीदारांविरुद्ध हत्येचा आरोप केला.इर्विन चौकातील सीसीटीव्ही शो-पीसघटनेचे गांभीर्य बघता, गाडगेनगर पोलिसांनी तत्काळ दखल घेत तक्रारीच्या अनुषंगाने आरोपी सुनिल गजभिये, रहमानखां पठाण तसेच अन्य चार जणांविरुद्ध खुन व पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा नोंदविला. या हत्याकांडातील आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. शीतल पाटील व सुनील गजभिये यांना १३ मार्च रोजी इर्विन चौकात एकत्र पाहिल्याचे नातेवाईक सांगत आहेत. त्या अनुषंगाने पोलिसांनी सोमवारी इर्विन चौक ते कॅम्प मार्गावरील विविध व्यापारी प्रतिष्ठानांतील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. आरोपींच्या शोधासाठी गाडगेनगर व गुन्हे शाखेच्या पोलिसांची प्रत्येकी दोन पथके तयार करण्यात आली असून, ते विविध दिशेने आरोपींचा शोध घेत आहेत. पोलिसांच्या एका पथकाची गजभियेच्या घरावर पाळत आहे, तर एक पथक बाहेरगावातील नातेवाइकांच्या घरी शोध घेत आहेत.पोलिसांनी इर्विन चौकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज ताब्यात घेण्याचे प्रयत्न केले. मात्र, ते सीसीटीव्ही कॅमेरा शो-पीस असल्याचे आढळून आले आहे. ते डेमो स्वरूपात लागले असून, त्यांचे चित्रीकरण स्टोअर झाले नसल्याचे आढळून आले आहे. कॅम्प रोड स्थित डी-मार्टमध्ये सुनील गजभिये दृष्टीस पडल्याचे एका नातेवाइकांनी पोलिसांना सांगितले होते. त्यानुसार पोलिसांनी तेथील सीसीटीव्हीची पाहणीसुद्धा केली.