शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षांत चार कोटींचा गुटखा जप्त

By admin | Updated: June 13, 2015 00:24 IST

गुटखा व पानमसाला बंदी लागू होऊन तीन वर्ष ओलांडून गेल्यावरही आज छुप्या मार्गाने विक्री सुरुच आहे.

३०६ जणांविरूध्द फौजदारी : अन्न, औषधी प्रशासन विभागाची धडक कारवाई, विक्रेत्यांची गोचीवैभव बाबरेकर अमरावतीगुटखा व पानमसाला बंदी लागू होऊन तीन वर्ष ओलांडून गेल्यावरही आज छुप्या मार्गाने विक्री सुरुच आहे. मागील चार वर्षात अन्न व औषधी प्रशासन विभागाने जवळपास चार कोटीचा गुटखा व पानमसाला जप्त केला असून ३०६ जणाविरूध्द फौजदारी कारवाई केली आहेत. महाराष्ट्रात गुटखा व पानमसाला विक्रीला बंदी आहे. मात्र, चार वर्षांच्या कारवाईचा आलेख बघता अद्यापही गुटखा व पानमसाला विक्री सुरु असल्याचे निदर्शनास येत आहे. तबांखूजन्य उत्पादनाच्या सेवन हे कर्करोगास आमंत्रण देणारे ठरते. मात्र, आरोग्याची पर्वा न करता बहूतांश नागरिक गुटखा व पानमसालाचे सेवन करीत आहेत. त्यामुळेच व्यवसायीकांचे व्यवसाय चांगलेच फोफावत आहेत. अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात अन्न व औषधी प्रशासनाचे धाडसत्र सुरुच आहे. २० जुलै २०१२ ते १९ जुलै २०१३ मध्ये अन्न व औषधी प्रशासनाने १५९ ठिकाणी धाड टाकून १ कोटी २७ लाख १० हजार ७१० किंमतीचा गुटका व पानमसाला जप्त केला आहे. त्यामध्ये ६४ व्यवसायीकांविरूध्द फौजदारी कारवाई केली असून १४७ प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. २० जुलै २०१३ ते १९ जुलै २०१४ दरम्यान १६६ ठिकाणी धाडी टाकून १ कोटी १९ लाख ६० हहजार ३६१ रुपयांचा गुटखा व पानमसाला जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये १६२ व्यवसायीकांविरूध्द फौजदारी कारवाई केली असून १३६ प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. तसेच २० जुलै २०१४ ते ३१ मार्च २०१५ दरम्यान १०३ ठिकाणी धाड टाकून १ कोटी १६ लाख ९३ हजार ६८४ रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये आतापर्यंत १०० व्यवसायीकांविरूध्द फौजदारी कारवाई करण्यात आली आहे. गुटखा बंदीनंतरही इतक्या मोठ्या प्रमाणात विभागात गुटखा व पानमसाला विक्री होतच आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक ठरणारा गुटखा व पानमसाला बंदी लागू केल्यानंतरही त्यांच्या विक्रीत मोठी झाली आहे. गुटखा व पानमसाला विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. मात्र, तरीसुध्दा गुटखा व पानमसाला बंदीवर परिणाम का होत नाही, हा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे शासनाने लक्ष वेधून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जनसामान्याची मागणी आहे. गुटखा व पानमसाला बंदी लागू झाल्यापासून छुप्या मार्गाने विक्री होत असल्याचे निदर्शनास आले आहे. अन्न व औषधी प्रशासनाकडून कारवाई होत आहे. मात्र, नागरिकांच्या मागणीमुळे छुप्या मार्गाने गुटखा व पानमसाला व्यवसाय होत आहे. - मिलींद देशपांडे,सहायक आयुक्त (अन्न).