शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

दादासाहेब गवर्इंच्या स्मारकाची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी

By admin | Updated: July 20, 2016 00:03 IST

ज्येष्ठ दलित नेते, माजी राज्यपाल रा. सू. उपाख्य दादासाहेब गवई यांचे शासनाकडून भव्यदिव्य स्मारक साकारले जात आहे.

२५ जुलैला कार्यक्रम : जिल्हाधिकाऱ्यांकडून जागेची पाहणीअमरावती : ज्येष्ठ दलित नेते, माजी राज्यपाल रा. सू. उपाख्य दादासाहेब गवई यांचे शासनाकडून भव्यदिव्य स्मारक साकारले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २५ जुलै रोजी या स्मारकाची पायाभरणी होणार आहे. त्याअनुषंगाने मंगळवारी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी जागेची पाहणी केली आहे.मार्डी मार्गालगत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या मागील बाजूस महसूलच्या जागेववर दादासाहेब गवई यांचे भव्यदिव्य स्मारक साकारले जाणार आहे. या स्मारकाच्या निर्मितीसाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. स्मारकस्थळी दादासाहेब गवई यांच्या सामाजिक, राजकीय वाटचालीचे बोलके चित्रण राहणार आहे. विधीमंडळ ते लोकसभा असा दादासाहेब गवर्इंचा राजकीय प्रवास या स्मारकात अधोेरखीत केला जाणार आहे. पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या महत्प्रयासाने जागेचा प्रश्न सुटला आहे. विद्यापीठाशेजारी असलेल्या महसूलच्या २२ एकर परिसरात त्यांचे स्मारक पूर्णत्वास जाणार आहे. या स्मारकाची पायाभरणी करण्याचे शासनाने निश्चित केले असून २५ जुलै रोजी मुख्यमंत्री फडणवीस अमरावतीत येत आहेत. कार्यक्रम होईल भव्यदिव्यअमरावती : जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी मंगळवारी जागेची पाहणी करताना कार्यक्रमाच्या अनुषंगाने चाचपणी केली आहे. विद्यापीठात या भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. जागेची पाहणी करताना महापालिका आयुक्त हेमंत पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता जाधव, उपविभागीय अधिकारी प्रवीण ठाकरे, भूमि अभिलेख विभागाचे अधिकारी भागवत, तहसीलदार सुरेश बगळे, विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी विलास नांदुरकर आदी उपस्थित होते.