शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाला गाडगेबाबांच्या दशसूत्रीचा विसर

By admin | Updated: June 20, 2016 00:02 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची स्थापना १९८३ साली करण्यात आली. संत गाडगेबाबांनी समाजाला दशसूत्रीचा संदेश दिला आहे.

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची स्थापना १९८३ साली करण्यात आली. संत गाडगेबाबांनी समाजाला दशसूत्रीचा संदेश दिला आहे. ते स्वत: निरक्षर असताना समाजशिक्षणाचे धडे त्यांनी प्रत्येक गावात जाऊन कीर्तनाच्या माध्यमातून गिरवले. त्यामुळे अमरावती विद्यापीठाला त्यांचे नाव देण्यात आले. विद्यापीठ प्रशासनाने ३३ वर्षांनंतर यंदा पाणपोई लावण्याचे सौजन्य दाखविले आहे. परंतु अन्य नऊ संदेशाची अंमलबजावणी केंव्हा करणार, असा सवाल सामान्यांचा आहे.वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबांच्या नावाने अमरावती विद्यापीठ चालते. गाडगेबाबा उभ्या आयुष्यात कोणत्याही शाळेत गेले नाही. मात्र त्यांनी समाजाला दिलेला दशसूत्रीचा संदेश हा प्रत्येकाच्या आयुष्यात परिवर्तनीय ठरणारा आहे. संत गाडगेबाबा दिवसा गाव -खेड्यात रस्ते, स्वच्छता करणे तर रात्रीला कीर्तन करून मनुष्याच्या मनातील घाण साफ करण्याचे कार्य आयुष्यभर केले आहे. एवढेच नव्हे तर समाजात जीवन जगताना त्यांनी कोणते कर्तव्य करावे, हे दशसूत्रीच्या माध्यमातून ठरवून दिले आहे. संत गाडगेबाबांनी केलेले महान कार्य हे अवस्मरणीय ठरणारे असताना विद्यापीठ प्रशासनाने गत ३३ वर्षांत केवळ पाणपाई लावून गाडगेबाबांच्या दशसूत्रीची जणू बोळवण चालविली, असे दिसून येते. ज्या महामानवाच्या नावाने विद्यापीठ स्थापन करण्यात आले त्यांच्याक डून दशसूत्री संदेशाची अंमलबजावणी होऊ नये, ही बाब खेदजनक मानली जात आहे. यावर्षी विद्यापीठ प्रशासनाने ‘तहानलेल्यांना: पाणी’ या संदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारासमोरील दर्शनी भागात पाणपोई सुरू केली आहे. परंतु उर्वरित नऊ संदेशाचे पालन केंव्हा होणार, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)ही आहे गाडगेबाबांची दशसूत्रीभुकेलेल्यांना अन्न, तहानलेल्यांना : पाणी, उघड्यानागड्यांना :वस्त्र, गरीब मुलामुलींना शिक्षणासाठी मदत, बेघरांना आसरा, अंध, पंगू, रोग्यांना औषधोपचार, बेकारांना रोजगार, पशू, पक्षी, मुक्या प्राण्यांना अभय, गरीब तरुण-तरुणींचे लग्न, दु:खी निराशांना हिम्मत ही गाडगेबांची दशसूत्री आहेत.