शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

अन्नातून विषबाधा; लागोपाठ तीन भावंडांचा मृत्यू

By admin | Updated: May 11, 2016 00:31 IST

धारणी तालुक्यातील धारणमहू गावात शिळ्या भातातून विषबाधेच्या प्रकरणातील मृतांची संख्या आता तीनवर पोहोचली आहे.

बालिकेवर उपचार सुरु : धारणीतील धारणमहू गावातील घटना अमरावती : धारणी तालुक्यातील धारणमहू गावात शिळ्या भातातून विषबाधेच्या प्रकरणातील मृतांची संख्या आता तीनवर पोहोचली आहे. ७ मे रोजी ही घटना घडली होती. याच दिवशी उपचारादरम्यान योगेश नामक बालकाचा मृत्यू झाला होता तर अन्य तीन गंभीर बालकांवर उपचार सुरू होते. सोमवारी मनीषा नामक मुलीचा तर मंगळवारी सुशीलनेही जगाचा निरोप घेतला. एका बालिकेवर अद्यापही नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. योगेश रामविलास भिलावेकर (८), सुशील भिलावेकर (७), मनीषा भिलावेकर (१२) अशी मृतांची नावे आहेत तर सावित्री भिलावेकर (१०) हिच्यावर उपचार सुरू आहेत. धारणमहू येथील रहिवासी भिलावेकर कुटुंबीयांनी ६ मे रोजी रात्री जेवणात भात बनविला होता. आई-वडिलांसह योगेश भिलावेकर, सुशील भिलावेकर, मनीषा भिलावेकर व सावित्री भिलावेकर या चार भावंडांनी तो भात खाल्ला. आरोग्य अधिकाऱ्याची धारणमहूला भेटअमरावती : थोडा भात शिल्लक राहिल्यानंतर तो भात दुसऱ्या दिवशी खाण्यासाठी ठेवला होता. दरम्यान ७ मे रोजी भिलावेकर कुटुंबातील आई-वडिल कामानिमित्त बाहेर गेले असता तो भात चार भावंडांनी खाल्ला. त्यानंतर त्या चारही भावंडांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना उलट्या, संडास व भोवळ येण्याचा त्रास जाणवला. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी त्यांना तत्काळ धारणी येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचाराकरिता नेले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे चौघांनाही जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्याचा सल्ला तेथील डॉक्टरांनी दिला. मात्र, इर्विनला आणतानाच योगेशचा मृत्यू झाला. रविवारी सुशील, मनीषा व सावित्री या तिघांनाही इर्विनमध्ये दाखल करून त्यांच्यावर तत्काळ उपचार सुरु करण्यात आले होते. मात्र, प्रकृतीत सुधारणा न झाल्याने तिघांनाही नागपूरला हलविण्यात आले. सोमवारी उपचारादरम्यान मनीषा हिचा मृत्यू झाला असून मंगळवारी सुशीलचा देखील मृत्यू झाला. आता भिलावेकर कुटुंबातील एक सदस्य सावित्री हिच्यावर उपचार सुरु आहे. तिघांच्याही मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून त्यांचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेमुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली असून जिल्हा आरोग्य अधिकारी नितीन भालेराव यांनी धारणमहू गावाला भेट देऊन सर्व मृतांच्या नातेवाईकांची भेट घेऊन चौकशी केली आहे. शिळा भात खाल्ल्याने चारही जणांची प्रकृती बिघडली होती. त्यातील बॉटिलिझन जंतूमुळे चारही मुलाच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम झाला आणि त्यांचा मृत्यू झाला. - नितीन भालेराव,जिल्हा आरोग्य अधिकारीशिळ्या अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती मिळाली. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली. मात्र, अन्नाचे नमुने मिळाले नसून वरिष्ठांना माहिती दिली. - मिलिंद देशपांडे, सहायक आयुक्त (अन्न)