शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

काँक्रिटीकरणावर लक्ष, व्यायामशाळांकडे दुर्लक्ष

By admin | Updated: July 24, 2014 23:37 IST

राज्य शासनाकडून आमदारांना दरवर्षी विकासकामांसाठी दोन कोटींचा वार्षिक निधी दिला जातो. या निधीतून सन २०१३-१४ मध्ये जिल्ह्यातील ८ आमदारांनी आपापल्या मतदारसंघात केलेल्या

आमदार निधी : वर्षभऱ्यातील विकास कामांचा लेखाजोखाअमरावती : राज्य शासनाकडून आमदारांना दरवर्षी विकासकामांसाठी दोन कोटींचा वार्षिक निधी दिला जातो. या निधीतून सन २०१३-१४ मध्ये जिल्ह्यातील ८ आमदारांनी आपापल्या मतदारसंघात केलेल्या विकास कामात काँक्रिटीकरण कामाकडे लक्ष वेधून व्यायामशाळांकडे मात्र दुर्लक्ष केल्याचे विकास कामांच्या वार्षिक माहिती पुस्तिकेमधून दिसून आली.लाखोंच्या संख्येने एका विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांना परिसरच्या विकासासाठी निवडून दिले जाते. या लोकप्रतिनिधिंकडून सर्वसामान्य जनतेना अनेक विकास कामांच्या अपेक्षा असतात. यामध्ये नागरिकांच्या मूलभूत गरजांसह रस्ते, पाणी, आरोग्य यासारख्या प्रमुख गरजा प्रधान्याने सोडविणे आवश्यक आहे. इतरही विकास कामे तेवढीच महत्त्वाची आहेत. वर्षाकाठी मिळणाऱ्या आमदार निधीतून आमदारांकडे विकास कामांची मागणी अधिक असते. मात्र यातून महत्त्वाच्या विकास कामांना प्राधान्यक्रम लावण्याची जबाबदारीही यांची आहे. मात्र हे सर्व करतताना आमदारांनी विकास हाच केंद्रबिंदू मानून वर्षभऱ्यात केलेली कामे समाधानकारक असली तरी या कामांवर नजर टाकल्यास काँक्रीट रस्ते, समाज भवन, सौंदर्यीकरण व तुरळक पाणीपुरवठा योजना या कामांवर लोकप्रतिनिधींनी अधिक भर दिला. यापैकी काहींनी वाचनालय, शाळा व शिक्षण संस्थांना साहित्य पुरवठा करण्यावरच निधी खर्च केल्याचे दिसून येते. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी वर्षभरात प्राप्त निधिनुसार विकास कामे केली. शिवाय शासनाकडून मिळणाऱ्या दोन कोटी रुपयांच्या निधीपेक्षा अधिक विकास कामे करण्यासाठी प्रयत्न केले. यामध्ये अनेक कामांकडे दुर्लक्ष झाले आहे. केवळ एका आमदारानेच व्यायाम शाळेला तर एकाने स्मशान भूमीला निधी उपलब्ध करून दिला. विशेष म्हणजे काही आमदारांनी साहित्य पुरवठा, प्रवासी निवारे यावर अधिक खर्च केले. एका आमदाराने पाणीपुरवठा योजनेवर भर दिला. मात्र इतर कामांवर दुर्लक्ष केले. सौंदर्यीकरण, समाज भवन व कांक्रीट रस्त्यांचा वर्षभरात बोलबाला असला तरी ८ ही आमदारांचा वार्षिक विकास कामात डांबरीकरण कामांना मात्र नगण्य प्रतिसाद दिल्याचे स्पष्ट होते. आमदारांनी काही ठिकाणी पेविंग ब्लॉक व इतर विकास कामे केली.