शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव एसटी उलटली

By admin | Updated: November 20, 2014 22:42 IST

भरधाव एसटी बस उलटून विद्यार्थ्यांसह ४३ प्रवासी जखमी झाले असून यातील चार जण गंभीर जखमी झाले. ही घटना कोल्हा काकडा ते परतवाडा मार्गावर चमक फाट्यानजीक गुरुवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.

विद्यार्थ्यांसह ४३ प्रवासी जखमी : चमक फाट्यावरील घटनाचमक बु. : भरधाव एसटी बस उलटून विद्यार्थ्यांसह ४३ प्रवासी जखमी झाले असून यातील चार जण गंभीर जखमी झाले. ही घटना कोल्हा काकडा ते परतवाडा मार्गावर चमक फाट्यानजीक गुरुवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. जखमींमध्ये एसटी वाहक मोहन रामभाऊ पायघन (३३, रा. अंजनगाव सुर्जी), काकडा येथील संतोष देवीदास नवलकर (६०), सोहेल खान सलीम खान (१७), सोहेल खान अय्युब खान (१६), मो. अजहर मो. आरीफ (१७), शे. रिजवान शे. रहेमान (१६), साहेब खाँ शरमद खाँ (१६), रासेगाव येथील प्रिया प्रेमदास धोटे (१८), निलिमा प्रल्हाद शिरदुसे (२४), निकिता राजेंद्र मोरे (१८), मुक्ता केशवराव खांडेकर (१९), पल्लवी गजानन शेकोकार (१८), श्वेता गणेशराव बोबडे (१४), पूनम बाळासाहेब मुऱ्हेकर (१८), अश्विनी अनिल बोबडे (१४), पूजा श्रीकृष्ण मेटकर, यशराज भुयार (१३), दीपा शरद खांडेकर (१७), प्रांजली मुकुंद खांडेकर (१७), राधा राजेंद्र धामणकर (१७),दिपाली राजेंद्र बांडाबुचे (१६), मयुरी बडे (१७), राधा धामणकर (१७), बोर्डी गावातील शुभांगी गजेंद्र शहाणे (२४), समीक्षा गजानन भडांगे (१६), धीरज राजेंद्र अडगोकार (२२) , शारदा प्रल्हाद पवार (१३), भाग्यश्री लक्ष्मण पवार (१०), श्रेय नंदू झुडपे (१२), धनश्री गजानन पवार (१२), समीक्षा प्रमोद शहाणे (१४), दामिनी शिवदास शहाणे (१५), किरण सतीश पाचघरे (१०), अनिकेत गादे(१७),नायगाव येथील नरेंद्र महादेव देशमुख (३०), चौसाळा येथील अश्विनी भास्कर साखरे (१८), मयुरी प्रल्हाद बडे (१७), कोल्हा येथील शिल्पा भास्कर आगरकर (२१), सौरभ विनायक ठाकरे (२१) आदींचा समावेश आहे. परतवाडा आगाराची एम.एच. ४०/८७२५ क्रमांकाची एसटी कोल्हा काकडा येथे रात्री मुक्कामी होती. विशेषत: विद्यार्थ्यांसाठी ही बस आहे. सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास चालक प्रमोद चांदणे हा प्रवासी घेऊन काकडाहून परतवाड्याकडे निघाला. या बसमध्ये विद्यार्थ्यांसह सुमारे ५० च्या वर प्रवासी होते. चमक फाट्याजवळ चालकाचे भरधाव वाहनावरील नियंत्रण सुटले व बस उलटली.