शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

विजेने घेतले पाच वर्षांत ११७ बळी

By admin | Updated: June 14, 2015 00:25 IST

दरवर्षी पावसाळ्यात कडाडणाऱ्या विजेने अनेक बळी जात असून मागील पाच वर्षांत अमरावती विभागात ११७ जणांना आपले

अमरावती विभागाची आकडेवारी : पावसाळ्यात शेतमजुरांचा अधिक मृत्यूमोहन राऊ त अमरावतीदरवर्षी पावसाळ्यात कडाडणाऱ्या विजेने अनेक बळी जात असून मागील पाच वर्षांत अमरावती विभागात ११७ जणांना आपले प्राण गमवावे लागले़ यात सर्वाधिक मृत्यू शेतात काम करणाऱ्या शेतमजुरांचे झाले आहेत़ दिवसेंदिवस बदलत्या निसर्ग चक्राची हानी सर्वच प्राणीमात्रांना बसत आहे़ उन्हाळ्यात ऊन्ह अधिक हिवाळ्यात थंडीचे प्रमाण सर्वाधिक असले तरी पावसाची सरासरी मात्र पावसाळ्यात कमी आहे़ ढगाळ वातावरण व विजेचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होतो़ मागील पाच वर्षांत विजेने बळी घेतले आहे़ पोटाची खळगी भरण्यासाठी शेतात गेलेल्या शेतमजुराला आपले प्राण या विजेमुळे गमवावे लागले़ विशेषत: यात पुरूष शेतमजुराचा मृत्यूत आकडा मोठा आहे़ पाच वर्षांत वाढली आकडेवारी शेतमजूर शेतात गेल्यानंतर येणाऱ्या पावसामुळे थेट मोठ्या झाडांचा आधार घेतोय व नेमक्या याच ठिकाणी वीज पडल्यामुळे जीव गमवावा लागतो. सर्वाधिक विजेचे बळी यवतमाळ व अमरावती जिल्ह्यात गेले आहेत़ तिसऱ्या क्रमांकावर अकोला, वाशीम हे जिल्हे आहेत़ येथील मृत शेतकरी, शेतमजुरांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळाली असली तरी त्या कुटुंबीयांना मिळाणाऱ्या तोकड्या मदतीमुळे संसाराची मोठी हानी झाली आहे़ मागील दोन दशकात वातावरणात कमालीचा बदल झाल्यामुळे मृग व आर्द्रा नक्षत्रात विजेचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होत आहे़यावर्षीदेखील विजांचा कडकडाट सुरू असल्याने नागरिकांनी सावध राहणे गरजेचे आहे.२० हजार अ‍ॅम्पियरचा प्रवाहआभाळातल्या विजेपासून धोका पोहचू नये, सुरक्षितता मिळावी यासाठी, कॉक्स नावाच्या अभियांत्याने सूचना दिल्या आहेत़ आपल्या घरात आपण वापरत असलेली वीज आणि आभाळातील वीज यात तत्वत: काहीही फरक नसतो़ परंतु घरातील विजेचा प्रवाह हा एक ते पाच अ‍ॅम्पियर इतक्या तीव्रतेची तर आभाळातील विजेची तीव्रता २० ते २०० किलो अ‍ॅम्पियर इतकी असते़ जमिनीवर वीज पडते तेव्हा जमिनीतून किमान २० हजार अ‍ॅम्पियर इतका वीज प्रवाह वाहू लागतो़ अशा वेळी तिथे उभ्या असलेल्या माणसाच्या दोन्ही पायातील अंतरातील दोन बिंदूत व्होल्टेजमध्ये वाढ होते़ वीज नेहमी जवळच्या आणि वीज प्रवाहास कि मान विरोध करणाऱ्या मार्गानेच भूमिगत होण्याचा प्रयत्न करते़ उघड्यावर चालणाऱ्या, खेळणाऱ्या किंवा शेतात असलेल्या माणसाच्या डोक्यावर किंवा खांद्यावर वीज पडल्यास ती शरीराच्या पृष्ठभागावरून समांतर मार्गाने भूमिगत होते़ तसेच जर मनुष्य झाडाजवळून जात असेल तेव्हा वीज पडली तर अगोदर झाडावर पडून नंतर माणसावर पडते़ तसेच त्यांच्या शरीराच्या पृष्ठभागावरून समांतर मार्गाने भूमिगत होते़ त्यामुळे शरीरावर अशा गंभीर भाजण्याच्या जखमा होतात़ मनुष्य चालत असेल तर त्याचा हात अगोदर विजेच्या मार्गात आला तर दुसरी काहीही इजा न होता़ कोपऱ्यापासून हात कापल्याप्रमाणे तुटून पडल्याचे काही अपघात प्रकरणात दिसून येते़अशी घ्यावी काळजीविजेचा कडकडाट होत असताना उघड्या मैदानातील माणसाने दोन्ही पाय जवळ घेऊन उकिडवे बसावे, गुडघ्यात डोके घालून एखाद्या चेंडू सारखा आकार होईल असे पहावे. एखांद्या उंच इमारतीजवळ असताना विजांचा कडकडाट ऐकू आला तर ताबडतोब त्या उंच इमारतीचा आश्रय घ्यावा़ आपण घरात असल्यास घरातील नळ, टेलीफोन, खिडक्या आणी विद्युत उपकरणापासून दूर रहावे़ जर विजांचा चमचमाट होऊन अर्ध्या मिनिटाच्या आत कडकडाट ऐकू आला तर ताबडतोब मोठ्या इमारतीचा, शाळेच्या परिसरात असेल तर शाळेचा आश्रय घ्यावा. मोटार साइकलने प्रवास करत असाल तर किंवा इतर कुठल्याही ट्रॅक्टरसारख्या उघड्या वाहनात असताना विजांचा कडकडाट ऐकू आला तर अशा वाहनांपासून ताबडतोब दूर जाऊन चेंडूसारखे शरीराचा आकार करून उकिडवे बसावे़ बस सारख्या वाहनात असाल तर आतच बसून रहावे अशा खबरदाऱ्या घेतल्या तर कडकडणाऱ्या विजेपासून सरंक्षण मिळण्यास मदत होईल़निसर्गाच्या बदलत्या चक्रक्रमाने विजेमुळे प्राणहानी होते शेतात काम करणाऱ्या प्रत्येक शेतमजूर व शेतकऱ्यांनी या विजेपासून आपले सरंक्षण करण्याची काळजी घेणे गरजेचे आहे़पावसाळ्यात अधीक पावसाचा जोर तसेच विजेचा कडकडाट होत असल्याचे दिसताच एखांद्या शेतातील पक्या झोपडीचा आश्रय घ्यावा अथवा घराकडे यावेत मोठ्या वृक्षाखाली थांबू नयेत़- नितीन व्यवहारे,एस़डी ओ़चांदूर रेल्वे.