शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांत राज्य दुष्काळमुक्त

By admin | Updated: December 31, 2016 01:30 IST

जलयुक्त शिवार योजनेतून दोन वर्षांत चार हजार गावे दुष्काळमुक्त करण्यात आली

मुख्यमंत्री : भाजप नवचेतना कार्यकर्ता संमेलन अमरावती : जलयुक्त शिवार योजनेतून दोन वर्षांत चार हजार गावे दुष्काळमुक्त करण्यात आली असून येत्या पाच वर्षांत संपूर्ण राज्य दुष्काळमुक्त होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. भाजप ग्रामीणच्यावतीने येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात गुरुवारी आयोजित नवचेतना कार्यकर्ता संमेलनात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी मंचावर पालकमंत्री प्रवीण पोटे, नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते व्ही. सतीश, अरुण अडसड, उपेंद्र कोठेकर, आ. चैनसुख संचेती, आ. सुनील देशमुख, आ. अनिल बोंडे, आ. प्रभुदास भिलावेकर, आ. रमेश बुंदिले, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यंवशी, निवेदिता चौधरी, एमआयडीसी असोशियएनचे अध्यक्ष किरण पातुरकर, माजी महापौर किरण महल्ले, भाजपचे शहराध्यक्ष जयंत डेहनकर आदी उपस्थित होते. पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, सात नगरपालिका काबीज करून जिल्ह्याने भाजपचा नवा इतिहास लिहिला आहे. केंद्र व राज्यात भाजपची सत्ता असून यावर सर्वसामान्यांचा विश्वास आहे. विदर्भात काँग्रेस, राष्ट्रवादीचा सफाया झाला असून राज्यात नगरपालिकांमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपवर शिक्कामोर्तब झाला आहे. राज्याचा कारभार हाताळताना दोन वर्षे पूर्ण झाली असून जलयुक्त शिवारमुळे चार हजार गावे दुष्काळमुक्त करण्यात आली आहेत. येत्या पाच वर्षांत राज्य दुष्काळमुक्त होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. आघाडी सरकारच्या कार्यकाळात नियोजनाचा अभाव होता. त्यामुळे काँग्रेसच्या ७० वर्षांच्या राजवटीत सिंचन प्रकल्प पूर्ण होऊ शकले नाहीत. मात्र आता केंद्र सरकारने राज्याला १२ हजार कोटी रुपये दिले असून सिंचन प्रकल्पाच्या भूमिअधिग्रहणासाठी निधीची कमतरता भासणार नाही, ही बाब त्यांनी स्पष्ट केली. गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडविताना शेतकरी लक्ष्य करून मॉडेल सुविधा दिली जाईल. कृषिपंपांना वीज, गाव-खेड्यात विजेची समस्या दूर करण्यासाठी केंद्राने विदर्भाला दोन हजार कोटी रुपयांची मदत केली आहे. त्यामुळे मेळघाटात १३२ केव्ही क्षमतेची विद्युत वाहिनी नेऊन दुर्गम भागात वीज पुरवठा करता येईल. नांदगाव पेठ येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत भाजप शासनाने मोठे १२ उद्योग आणले आहेत. कृषीला उद्योगाशी जोडण्याचे काम करायचे आहे. पुढील तीन वर्षात शेतकरी समृद्ध होईल. कनेक्टिव्हिटी, डिजिटायझेनद्वारे शिक्षण, आरोग्य यंत्रणा सक्षम करायची असून हाच प्रगतीचा मार्ग ठरेल. जागतिक बँकेने विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला असून चार हजार गावांत पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. विविध योजना सामान्यापर्यंत पोहोचत आहे. केंद्र व राज्य सरकारवर जनतेने शिक्कामोर्तब केला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुका काबीज करताना भाजप कार्यकर्त्यांनी उमेदवारीसाठी नेत्यांमागे नव्हे, तर जनतेमागे फिरावे. उमेदवारी कोणाला, याचे सर्वेक्षण केले जाईल त्यानंतर उमेदवारीचा निर्णय होईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. भ्रष्टाचार, कॅशलेस व्यवहार व काळा पैसा आदींबाबत जनतेमध्ये जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. (प्रतिनिधी)