शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलदाराने पकडले अवैध रेतीचे पाच ट्रक

By admin | Updated: March 26, 2015 00:05 IST

यवतमाळ येथून अमरावतीकडे अवैधरीत्या रेतीची वाहतूक करणारे पाच ट्रक नवनियुक्त तहसीलदाराने पकडून थेट पोलीस कारवाई केली आहे़ महसूल प्रशासनात कोणतीही नियमबाह्य कामे होणार नाहीत.

धामणगाव रेल्वे : यवतमाळ येथून अमरावतीकडे अवैधरीत्या रेतीची वाहतूक करणारे पाच ट्रक नवनियुक्त तहसीलदाराने पकडून थेट पोलीस कारवाई केली आहे़ महसूल प्रशासनात कोणतीही नियमबाह्य कामे होणार नाहीत. उलट नियमबाह्य कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोलीस कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा तहसीलदार राजन यांनी बुधवारी दिला.भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी षण्मुख राजन यांची तहसीलदारपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी अवैधरीत्या रेती वाहतूक करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत़ धामणगाव तालुक्यातील वर्धा नदीतील रेतीघाटांचा लिलाव अद्याप व्हायचा असताना यवतमाळ जिल्ह्यातून अवैधरीत्या अमरावतीकडे रेती वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळताच तहसीलदारांनी मंगळवारी रेतीने भरलेले पाच ट्रक पकडले. यात दोन ब्रासपेक्षा अधिक रेती असल्यामुळे त्यांनी थेट फौजदारी कारवाई केली़रेतीची वाहतूक करताना ट्रकमध्ये केवळ दोन ब्रास रेती असणे गरजेचे आहे़ यापेक्षा अधिक रेती आढळल्यास संपूर्ण ट्रकमधील रेतीवर दंड आकारण्यात येणार आहे़ तसेच ट्रकमालक व चालकांवर थेट फौजदारी कारवाईदेखील केली जाणार आहे़ यासाठी त्यांनी पाच विशेष पथकांची नियुक्ती केली आहे़ रात्री अवैधरीत्या रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकवर थेट फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश तहसीलदार राजन यांनी दिले आहेत. दरम्यान, तहसील कार्यालयात सर्वसामान्य माणसांना कोणताही त्रास होऊ नये, याची दखल महसूल कर्मचाऱ्यांनी घ्यावी तसेच तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश त्यांनी बुधवारी दिले़ (तालुका प्रतिनिधी)