शहरं
Join us  
Trending Stories
1
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
2
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
3
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
4
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
5
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
6
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
7
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
8
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
9
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
10
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
11
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
12
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
13
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
14
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
15
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
16
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
17
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
18
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
19
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
20
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक

आश्रमात आणखी पाच अपमृत्यू

By admin | Updated: October 17, 2016 00:09 IST

शंकर महाराज यांच्या पिंपळखुटा येथील आश्रमात प्रथमेश सगणे आणि अजय वणवे या कोवळ्या मुलांचा नरबळी देण्याच्या...

सत्यशोधन अहवाल : अंधश्रद्धा निर्मूलन समितीने उलगडले धक्कादायक वास्तवअमरावती : शंकर महाराज यांच्या पिंपळखुटा येथील आश्रमात प्रथमेश सगणे आणि अजय वणवे या कोवळ्या मुलांचा नरबळी देण्याच्या प्रयत्नांपूर्वी आणखी पाच संशयास्पद मृत्यू झाल्याचे धक्कदायक वास्तव अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सत्यशोधन अहवालात नमुद करण्यात आले आहे. समितीने या अहवालाच्या प्रती जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्या आहेत. न्यायालयातही हा अहवाल सादर करण्यात आला आहे. दि. १ सप्टेंबर २००६ ला सकाळी ८ ते ९ च्या दरम्यान सागर दिवाकर पाथरे या तिवसा तालुक्यातील वरुडा येथील विद्यार्थ्याचा पिंपळखुटा येथील आश्रमात शॉक लागून संशयास्पद मृत्यू झाला. सागर हा आश्रमातील शाळेत इयत्ता दहावीत होता. सागरचा मोठा भाऊ रूपेश हादेखील आश्रमातच शिकत होता. आश्रमातील पूजाअर्चा, स्वच्छता राखणे, अशी कामे तो करायचा. घटना घडली त्यावेळी तो पूजा करीत होता. लहान भावाला विजेचा धक्का लागल्याचे त्याला सांगण्यात आले. धावतच त्याने घटनास्थळ गाठले. सागरला धुगधुगी होती. त्याला प्रथम अंजनसिंगी प्राथमक आरोग्य केंद्रात नेले गेले. नंतर धामणगावच्या खासगी इस्पितळात नेले गेले. प्रकृती खालावल्याने डॉक्टरांनी अमरावतीला नेण्यास सांगितले. अमरावतीच्या वाटेवरच सागरचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे संपूर्ण प्रकरण आश्रम व्यवस्थापनाने दडपले. या घटनेची पोलीस तक्रार नाही. शवविच्देछन करण्यात आले नाही. रूपेश पाथरेला नोकरीचे आमिष देऊन सागरचा मृत्यू आश्रमाने दडपला, असे सत्यशोधन अहवालात नमूद करण्यात आले आहे. पिंपळखुट्यात एक लहानसे हॉटेल चालविणाऱ्या सुभाष मेश्राम यांची मुलगी आश्रमातील शाळेत इयत्ता नववीत शिकायची. सुमारे दोन वर्षांपूर्वी तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. पांडुरंग ऊके हा शंकर महाराजांचा भाचा आहे. त्याची मुलगी आश्रमशाळेत इयत्ता सातवीत शिकत होती. दीड वर्षांपूर्वी विष प्राषन करून तिने आत्महत्या केली. आश्रमातील कृषीविज्ञान पदवी अभ्यासक्रमाला शिकणारी पूजा डेरे नावाची मुलगी आश्रम परिसरात ५० टक्के जळाली. नंतर ती मृत्युमुखी पडली. पिंपळखुटा येथील रहिवासी आणि पिंपळखुटा ग्रामपंचायतीचे सरपंचपद भूषविलेले श्रीधर गायके हे शंकर महाराज यांचे नि:स्सिम भक्त होेते. त्यांचे वास्तव्य आश्रमातच होते. ते दोन वर्षांपूर्वी अचानक बेपत्ता झाले. काही दिवसांनी त्यांचा मृतदेह बहिरम परिसरातील जंगलात कुजलेल्या अवस्थेत बेवारस आढळून आला. प्रेत श्रीधर गायके यांचेच होते, हे त्यांच्या कपड्यांवरून आळखले गेले. अहवालात या पाच मृत्युंचा उल्लेख करण्यात आला आहे. शोधकार्य करून समितीने ही माहिती प्राप्त केली आहे. सर्वच मृत्यू आश्रमाशी संबंधित आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांनी यांनी दुर्लक्ष न केल्यास या संशयास्पद मृत्युचे गुढ उकलू शकेल.