शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

खुल्या कारागृहातील बंद्यांना मत्स्यपालनातून रोेजगार

By admin | Updated: August 2, 2016 00:03 IST

येथील मध्यवर्ती कारागृहात सुरू असलेल्या खुल्या कारागृहातील बंदीजनांनी मत्स्यपालन उपक्रम सुरु केला आहे.

स्वयंरोजगाराचे धडे : अंगभूत गुणांवर आधारित रोजगाराचा प्रयत्नअमरावती: येथील मध्यवर्ती कारागृहात सुरू असलेल्या खुल्या कारागृहातील बंदीजनांनी मत्स्यपालन उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमातून बंदीजनांना स्वंयरोजगार उपलब्ध झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे.कारागृहातील बंदीजनांची दिनचर्या सूर्योदय ते सूर्यास्त अशी असली तरी त्यांच्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी तसेच त्यांचे पुनर्वसन करण्याच्या अनुषंगाने विविध उपक्रम राबविण्याचे गृहविभागाचे धोरण आहे. त्यानुसार येथील मध्यवर्ती कारागृहात पुरूष आणि महिला बंद्यांसाठी पाषाणाच्या चार भिंतींच्या आत नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून बंद्यांमध्ये सामाजिक जाण निर्माण केली जाते. तसेच महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी साजरी करताना महामानवांनी देशासाठी केलेले कार्य देखील बंद्यांना सांगितले जाते. कारण न्यायालयाच्या आदेशानुसार विविध गुन्ह्यांखाली शिक्षा भोगणाऱ्या बंद्यांच्या मनात न्यूनगंड अथवा तिरस्काराची भावना निर्माण होऊ नये, यासाठी त्यांना रोजगार उपलब्ध करुन दिला जातो. बंद्यांमधील अंगभूत गुणांवर आधारित रोजगार देण्याचा प्रयत्न कारागृह प्रशासनाचा असतो. त्यानुसार बाजारपेठेतील मागणीनुसार रोजगार, स्वंयरोजगाराचे प्रशिक्षण देवून बंद्यांच्या हाताला रोजगार दिला जातो. बंद्यांना दुहेरी उत्पन्नाचा लाभअमरावती : याच पार्श्वभूमिवर बंद्यांनी साकारलेल्या शेततळ्यात मत्स्यपालन व्यवसाय सुरु करण्यात आला आहे. या व्यवसायाचे प्रशिक्षण घेतलेल्या खुल्या कारागृहातील बंद्यांची यासाठी निवड करण्यात आली आहे. मत्स्यपालन व्यवसायाशी निगडित कामे हे देखील या खुल्या कारागृहातील बंद्यांवर सोपविण्यात आली आहेत. बाजारपेठेत ज्या जातीच्या माशांची मागणी आहे, त्या जातीचे मत्स्यपालन केले जात आहे. स्वंयरोजगारातून आर्थिक उत्पन्न आणि रोजगार असा दुहेरी लाभ साधण्यात आला आहे. यापूर्वी कारागृहात एलईडी लाईट, सूतकाम, शिवणकाम, सौदर्यप्रसाधने, सुतारकाम, फर्निचरनिर्मिती आदींच्या माध्यमातून कैद्यांना रोजगाराचे साधन उपलब्ध करुन देण्यात आले आहे.