अमरावती : मुस्लिमांसाठीचे राज्यातील पहिले जात व वैधता प्रमाणपत्र येथील १४ वर्षीय अफराज खान याला गुरुवारी एका विशेष कार्यक्रमात वितरित करण्यात आले. मुस्लिम समुदायातील ५० जातींना शिक्षण व नोकरीत आरक्षण देण्यात आले आहे. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या मुस्लिम हेल्पलाइनच्या माध्यमातून सदर प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आवाज बुलंद करण्यात आला होता. आमदार रावसाहेब शेखावत यांनी या लढ्याला बळ दिले होते. त्याचा परिपाक म्हणून दस्तऐवजांच्या जाचक अटी रद्द करण्यात आल्या होत्या. जात व वैधता प्रमाणपत्र जारी करण्याचा निर्णयदेखील महसूल अधिकाऱ्यांनी घेतला होता. महसूल कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लांबलेला हा सोहळा अखेर गुरुवारी ईद मिलनच्या पर्वावर पार पडला. उपविभागीय अधिकारी प्रवीण ठाकरे, समाजकल्याण अधिकारी नाईक यांनी हे प्रमाणपत्र अफरोज खान याला वितरित केले. यावेळी आमदार शेखावत, वसंतराव साऊरकर, हेल्पलाइनचे अध्यक्ष रम्मूशेठ, इरफान अथर अली, बबलू शेखावत, विलास इंगोले मोहम्मद आसिफ तवक्कल, सादीक शहा, मोहम्मद सादीक, नगरसेवक शेख जफर, लुबना तनवीर, मुन्ना नवाब आदी उपस्थित होते. या उपक्रमामुळे मुस्लिम समुदायामध्ये आनंद व्यक्त होत आहे.
मुस्लिमांसाठीचे पहिले जात-वैधता प्रमाणपत्र अमरावतीत वितरित
By admin | Updated: August 7, 2014 23:40 IST