शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

१६० व्यक्तींवर एफआयआर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 22:25 IST

शहरातील चौकाचौकांचे विद्रुपीकरण करणाऱ्या अनधिकृत होर्डिंगविरोधात आता बाजार व परवाना विभागाने कारवाईचा सपाटा लावलेला आहे. या पाच दिवसांत ३२० होर्डिंग जप्त करण्यात आले, तर १६० व्यक्तींविरोधात विविध पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी करून एफआयआर नोंदविण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिली.

ठळक मुद्देअनधिकृत जाहिरातबाजीला लगाम : पाच दिवसांत ३२० होर्डिंग काढले, कारवाई निरंतर राहणार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरातील चौकाचौकांचे विद्रुपीकरण करणाऱ्या अनधिकृत होर्डिंगविरोधात आता बाजार व परवाना विभागाने कारवाईचा सपाटा लावलेला आहे. या पाच दिवसांत ३२० होर्डिंग जप्त करण्यात आले, तर १६० व्यक्तींविरोधात विविध पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी करून एफआयआर नोंदविण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिली. या सर्व प्रकरणात महाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंध अधिनियम १९९५ चे कलम ३ व ४ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले.बाजार परवाना विभागाच्या सहायक आयुक्त निवेदिता घार्गे यांच्या मार्गदर्शनात बाजार परवाना विभागाद्वारे ही मोहीम राबविण्यात आली. यामध्ये राजकमल चौक, राजापेठ, नवाथे चौक, गोपालनगर, बेनाम चौक, यशोदा नगर, दस्तुरनगर, बियाणी चौक, चपराशीपुरा, कोर्ट परिसर, गर्ल्स हायस्कूल, पंचवटी चौक, शेगाव नाका परिसर, कठोरा नाका, विलासनगर, कॉटन मार्केट, इर्विन चौक, पठाण चौक, जयस्तंभ व बडनेरा येथीळ ३२० अनधिकृत होर्डिंग व फलक या पाच दिवसांत काढण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले. या कारवाईत बाजार व परवाना विभागाचे संकेत वाघ, अभियंता शेखर ताकपिरे, राहुल वैद्य, सागर आठोर, अतिक्रमण विभागाचे प्रवीण इंगोले, निरीक्षक व पोलीस पथकाचे मनीष मानकर यांनी ही संयुक्त कारवार्ई केली.प्रत्येक झोनसाठी स्वतंत्र अधिकारीस्वच्छ सर्वेक्षणात शहराचे सौंदर्यीकरणदेखील तेवढेच महत्त्वाचे असल्याने त्यासाठी प्रत्येक झोनला एक स्वतंत्र अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येर्ईल. सध्या एकच अधिकारी असल्याने मर्यादा येत आहेत. त्यामुळे आता या अनधिकृत फलकासाठी प्रतिबंध करण्यात येईल. एफआयआर दाखल करणे ही शेवटची व चौथी स्टेप आहे. त्यापूर्वी आम्ही सर्व प्रकारात सांगण्याचा प्रयत्न केला असल्याचे आयुक्त संजय निपाणे यांनी सांगितले.