साहित्य जळाले : ‘फॉरेन्सिक लॅब’च्या पथकाकडून तपासणीलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा व सत्र न्यायालयातील ४ थे सहदिवाणी न्यायाधीशांच्या न्यायालयीन कक्षाला रविवारी सकाळी अचानक लागल्याने खळबळ उडाली. याआगीत न्यायाधीशांच्या न्यायालयीन कक्षासह त्यांच्या वैयक्तिक कक्षातील काही साहित्य जळून खाक झाले.अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सकाळी ८ वाजता घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळविले. न्यायालयातील वैश्य यांनी आग लागल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. पोलिसांमार्फत अग्निशमन दलाला माहिती मिळताच त्यांनी तत्काळ पाण्याचे दोन बंब घेऊन घटनास्थळ गाठले व आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु केलेत. मात्र, आगीच्या विळख्यात सापडलेले संगणक, टेबल, खुर्च्या व आलमारी आगीत भस्मसात झाले. घटनेच्या चौकशीकरिता गाडगेनगर पोलीस व न्यायवैद्यक प्रयोगशाळेची चमू घटनास्थळी पोहोचली. घटनेच्या माहितीवरून प्रभारी मुख्य न्यायाधीश ज्ञा.वा.मोडक यांच्यासह चवथे सहदिवाणी न्यायाधीश (क-स्तर) राठोड यांनी न्यायालयात जाऊन पाहणी केली. न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे उपसंचालक विजय ठाकरे यांच्या मार्गदर्शनात चमुने घटनास्थळाची तपासणी करून आवश्यक ती माहिती व नमुने घेतले. आगीचे निश्चित कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांचा पंचनामा व न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालावरून ते स्पष्ट होणार आहे. याघटनेसंदर्भात उच्च न्यायालयाला माहिती दिली आहे.
न्यायाधीशांच्या कक्षाला आग
By admin | Updated: June 5, 2017 00:03 IST