शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या गॅस टँकरच्या केबिनला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 23:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क घुईखेड/तळेगाव दशासर : एचपीचा गॅस टँकर घेऊन जाणाऱ्या ट्रकने चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथील एक्स्प्रेस हाय-वेवर ...

ठळक मुद्देजीवितहानी टळली : घुईखेड येथील एक्स्प्रेस हायवेवरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कघुईखेड/तळेगाव दशासर : एचपीचा गॅस टँकर घेऊन जाणाऱ्या ट्रकने चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथील एक्स्प्रेस हाय-वेवर अचानक शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली होती. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही.प्राप्त माहितीनुसार, नागपूरवरून मुंबईकडे एचपी गॅसचा टँकर घेऊन जाणाऱ्या भाटिया कंपनीच्या एमएच ३४ वाय ३३०८ या क्रमांकाच्या ट्रकने चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेडनजीक हायवेवर अचानक पेट घेतला. यामध्ये ट्रकचे केबिन पूर्णत: जळाले आहे. चालक रामविलास यादव (रा. गोरखपूर) हा सुखरूप बाहेर पडलाय. सदर आग शॉर्टसर्कीटने लागल्याचे समजते. घुईखेड ग्रामस्थांनी तीन टँकरच्या मदतीने जवळपास १ तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविले.आग विझविण्यासाठी घुईखेडचे सरपंच विनय गोटफोडे, शेख रफीक, शेख समीर, श्रीकांत खोब्रागडे, लहानू मेश्राम, शरद लडके, नारायण पाखरे, गुड्डु सिंगारे, बंडू नाचणे, बालू मिचार्पुरे, राहुल बागडे आदींनी परिश्रम घेतले. घटनास्थळावर पोलीस प्रशासनसुद्धा तात्काळ पोहचले होते. गॅसचा टँकर रिकामा असल्यामुळे मोठा अनर्थ टळला.अग्निशमन ‘लेटलतीफ’धामणगाव रेल्वे व चांदूर रेल्वे येथील अग्निशमन दल घटनास्थळी उशिरा पोहचले. त्यापूर्वीच गावकºयांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. त्यामुळे दोन्ही अग्निशमन दलाच्या गाड्यांंना तेव्हाच परतावे लागले.वाहनांच्या लांब रांगाएक्स्प्रेस हायवे असल्याने वाहनांची वर्दळ सुरूच असते. सदर अपघात झाल्याने दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे जवळपास तासभर वाहतूक विस्कळीत झाली होती.