शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
4
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
5
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
6
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
7
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
8
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
9
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
10
मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!
11
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
12
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
13
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
14
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
15
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
16
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
17
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
18
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
19
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 
20
उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

कुजलेल्या सोयाबीनमध्येही आशेचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 06:00 IST

शेतकऱ्यांच्या शिवारातील पिकांच्या नुकसानाची सद्यस्थिती पाहण्यासाठी ‘लोकमत’ने थेट दहेंडा गाव गाठले आणि तेथील शेतकºयांकडून शेतीचे, पिकांचे नुकसान जाणून घेतले. दशकभराच्या कालावधीनंतर यंदा पहिल्यांदाच तालुक्यातील सिपना, गडगा, तापी या मोठ्या नद्यांना महापूर गेलेत. फुगलेल्या नद्यांचे पाणी शेतात शिरल्याने पिकांसह शेती खरडून गेली.

पंकज लायदे/धारणी : मेळघाटातील आदिवासी बांधवांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. यंदा परतीच्या पावसाने शेतकऱ्यांवर संकट कोसळले. सवंगणी झालेले सोयाबीन शेतात कुजले. शेंगांना कोंब फुटले असले तरी यामध्ये काहीतर मिळेल, या आशेपोटी शेतकरी कुजलेले सोयाबीनचे गंज जमा करीत असल्याचे तालुक्यातील जळजळीत वास्तव आहे. समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी धडपडत असलेले आदिवासी बांधवावर यंदा परतीच्या पावसाने कुटाराघात घातला.शेतकऱ्यांच्या शिवारातील पिकांच्या नुकसानाची सद्यस्थिती पाहण्यासाठी ‘लोकमत’ने थेट दहेंडा गाव गाठले आणि तेथील शेतकºयांकडून शेतीचे, पिकांचे नुकसान जाणून घेतले. दशकभराच्या कालावधीनंतर यंदा पहिल्यांदाच तालुक्यातील सिपना, गडगा, तापी या मोठ्या नद्यांना महापूर गेलेत. फुगलेल्या नद्यांचे पाणी शेतात शिरल्याने पिकांसह शेती खरडून गेली. त्या अस्मानी संकटात भर पडली ती परतीच्या पावसाने. १ ऑक्टोबरपासून सलग महिन्याभर धारणी तालुक्यात पाऊस मुसळधार कोसळला. त्यामुळे सोयाबीन काढण्यासाठी शेतकºयांना सवडच मिळाली नाही. तीन दिवसांपासून उघाड असल्याने सोयाबीन शेतातच सवंगून ठेवण्यात आले. मात्र, कालपरवाच्या पावसाने गंजीतील सोयाबीनला कोंब फुटले. ते कुजले. दुसरीकडे कापसाच्या वाता झाल्या आहेत. बोंडे सडली. फुटून कापूस बाहेर पडला; मात्र पावसाची संततधार लागल्याने कापूस वेचता आला नाही.अशी आहे परिस्थिती‘लोकमत’ने प्रातिनिधिक स्वरूपात दहेंडा येथील आकाश जावरकर याची भेट घेतली. त्याच्याकडे वडिलोपार्जित तीन एकर शेती आहे. आई, वडील, मोठा भाऊ, लहान भाऊ असे पाच जणांचे कुटुंब आहे. आकाशने मोठ्या भावाला पुण्याला एका कंपनीत कामाला पाठविले. त्याने मशागतीसाठी २५ हजार रुपये पाठविले. त्यातून तीन एकरांत सोयाबीन पेरले. १८ नोव्हेंबरपासून परतीच्या पावसाने सोंगलेले सोयाबीन जमिनीवरच पड़ून राहिले. त्यातच उन्ह पडल्याने मंगळवारी त्याची उलथापालथ करण्यात आली. सोयाबीन पूर्ण काळे पडले आहे. परतीच्या पावसाने आमच्या तोंडचा घास हिसकला. आता रबीची पेरणी कुठल्या भरवशावर करावी, असा त्यांचा सवाल आहे. मायबाप सरकारने शेतांचे पंचनामे न करता सरसकट मदत द्यावी, असे मत आकाशने व्यक्त केले.

टॅग्स :agricultureशेती