शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

निधीस विलंब, शासनाला भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2017 00:06 IST

१४ व्या वित्त आयोगाअंतर्गत जनरल बेसिक ग्रॅन्ड स्वरूपात केंद्र शासनाकडून २०१६-१७ च्या दुसऱ्या टप्प्यातील निधी वाटपास १० दिवसांचा विलंब झाल्याने...

झेडपी : १४ व्या वित्त आयोगाच्या निधीला ५.८१ लाख रूपये व्याजलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : १४ व्या वित्त आयोगाअंतर्गत जनरल बेसिक ग्रॅन्ड स्वरूपात केंद्र शासनाकडून २०१६-१७ च्या दुसऱ्या टप्प्यातील निधी वाटपास १० दिवसांचा विलंब झाल्याने या विलंबापोटी जिल्ह्याला ५ लाख ८१ हजार रूपयांचा अतिरिक्त निधी मिळाला आहे.केंद्र शासनाकडून १४ व्या वित्त आयोगांतर्गत जनरल बेसिक ग्रॅन्ड स्वरूपात राज्याला दुसरा हप्ता देण्यात आला होता. केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या सूचनेनुसार १४ व्या वित्त आयोगाचा निधी केंद्र शासनाकडून प्राप्त झाल्यापासून १५ दिवसांत वितरित करणे बंधनकारक आहे. अन्यथा झालेल्या विलंबावर स्थानिक स्वराज्य संस्थांना व्याज द्यावे लागते. केंद्र शासनाने राज्याला ११२३.८८५० कोटी निधी दिला होता. हा निधी वितरणास १० दिवसांचा विलंब झाला होता. या विलंबापोटी व्याज म्हणून राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना २०१७-१८ या आर्थिक वर्षात वितरित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्यानुसार दुसऱ्या हप्त्याच्या ११२३.८८ कोटी रुपये निधीच्या वितरणास झालेल्या साधारणपणे १० दिवसांच्या विलंबापोटी व्याज म्हणून १.८७०५ कोटी इतका जिल्हा परिषदांना वितरित केला आहे. अमरावती जिल्ह्यासाठी ५ लाख ८१ हजार रूपयांचा निधी मिळाला आहे. हा निधी तत्काळ कोषागारातून काढून संपूर्ण प्रस्तुत निधी विहित केलेल्या निधी वाटपाच्या आधारे सर्व ग्रामपंचायतींना ई.सी. एस.एनईएफटी आरटीजीएसव्दारे ग्रामपंचायतींच्या खात्यावर पाच ते दहा दिवसांच्या आता वर्ग करावा लागणार आहे.विलंब झाल्यास द्यावे लागणार व्याजकोषागारातून निधी काढल्यानंतर जिल्हा परिषदेला ५ ते १० दिवसांच्या आत ग्रामपंचायतींच्या खात्यावर हा निधी वितरित करावा लागणार आहे.निधी वितरित करण्यास विहित कालावधीपेक्षा जास्त विलंब झाल्यास त्या विलंबाबत ग्रामपंचायतींना भारतीय रिझर्व्ह बँकेच्या दराने व्याज द्यावे लागणार आहे. ग्रामपंचायतींना दिलेल्या सूचनेनुसार १४ व्या वित्त आयोगाअंतर्गत प्राप्त निधीच्या व्यवहारासाठी उघडलेल्या बॅकेच्या स्वतंत्र खात्यातच हा निधी ठेवावा लागणार आहे. या खात्यातील व्यवहार ग्रामपंचायतींच्या नावाने सरपंच व ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांच्या संयुक्त स्वाक्षरीने करावा लागणार आहे.