शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

भूखंड व्यवहारात शासनाला आर्थिक फटका

By admin | Updated: September 3, 2014 23:01 IST

स्थावर मालमत्तेच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात दलाल व दुय्यम निबंधकांच्या संगनमताने भूखंडाची प्रत्यक्ष कागदपत्रांवर कितीतरी पटीने कमी किंमत दाखवून शासनाचा लाखोंचा महसूल बुडविण्यात येत आहे.

सुनील देशपांडे - अचलपूरस्थावर मालमत्तेच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात दलाल व दुय्यम निबंधकांच्या संगनमताने भूखंडाची प्रत्यक्ष कागदपत्रांवर कितीतरी पटीने कमी किंमत दाखवून शासनाचा लाखोंचा महसूल बुडविण्यात येत आहे. हा गोरखधंदा मागील कित्येक वर्षांपासून सुरू आहे. मागील १५-२० वर्षांच्या कालावधीत कोट्यवधी रूपयांचा महसूल बुडवून शासनाला चुना लावण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ परतवाड्यात आहे. येथील जागेला चांगली किंमत मिळू लागली आहे. कित्येक फुललेल्या संत्राबागा तोडून तेथे प्लॉट पाडण्यात आलेत. महागडे विकलेही गेले आहेत. दहा वर्षांत त्यांच्या किमती चौपट झाल्या आहेत. कोणत्याही भूखंडाचा सौदा केला असता त्याची किंमत लाखोंच्या घरात जाते. प्रत्यक्ष सौदा अत्यल्प केला जातो. बाजारपेठेत त्या जागेची किंमत दुप्पट-तिप्पट असते. प्रत्यक्षात खरेदी-विक्रीची किंमत लपविली जाते. त्यामुळे शासनाचा लाखो रूपयांचा महसूल भूखंड माफियांच्या घशात जात आहे. अमरावती-परतवाडा मार्ग व परतवाड्याला जवळ पडणाऱ्या भूखंडाला सोन्याचे भाव असल्याने येथील प्लॉट किंग म्हणून ओळखले जाणाऱ्या लोकांनी कृषक खरेदी करून संबंधित अधिकाऱ्यांचे हात ओले करून भूखंड विक्रीचा व्यवसाय स्वीकारला होता. शहरात ८०० ते १००० रूपये प्रति चौरस फुटाप्रमाणे सर्रास विक्री होत असून दुय्यम निबंधक कार्यालयात प्रत्यक्षात खरेदी-विक्रीची किंमत कमी दाखविली जाते.जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी लागेल. एलो झोनच्या प्लॉटमध्येही त्रुट्या काढून परत केले जाते. परंतु दलालामार्फत गेल्यास नियमात पळवाटा शोधून काम केले जाते. त्यासाठी हजारो रूपये टेबलखालून घेतले जातात. मनीष लाडोळे यांच्या तक्रारीवरून आठ दिवसांपूर्वी मुद्रांक विक्रेता दंते यांचेमार्फत लाच घेताना दुय्यम निबंधक रमेश उखळकर यांना एसीबीने पकडले होते.