शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम विभागात कोट्यवधीची आर्थिक अनियमितता

By admin | Updated: September 16, 2016 01:05 IST

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या रस्ते, आरोग्यकेंद्र,

अमरावती : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या रस्ते, आरोग्यकेंद्र, वाहनतळ ,भक्तनिवास, प्रशासकीय इमारतींसह अन्य बांधकामांमध्ये कोटयवधी रूपयांची आर्थिक अनियमितता झाल्याचा ठपका पंचायतराज समितीने ठेवला आहे. सन २०१२-१३ या आर्थिक वर्षामध्ये झालेल्या बांधकामाचा आढावा घेतल्यानंतर विविध आघाड्यांवरील अनियमिततेवर समितीने बोट ठेवले आहे. स्थानिक निधीलेखा परीक्षा संचालनालयाने प्रसिध्द केलेल्या अहवालातून हा सावळा गोंधळ उघड झाला. भातकुली तालुक्यातील घाटखेडा येथे ठक्करबाप्पा आदिवासी विकास योजनेंतर्गत ५ लाख रूपयांचा काँक्रीट रस्ता बांधण्यात आला. मात्र, निधीग्राह्यता संपल्यानंतर त्या कामाचे आदेश देण्यात आलेत. याकामाबाबत शासकीय प्रयोगशाळेचा चाचणी अहवाल सादर करण्यात आला नाही. याशिवाय देयकातून दोन टक्के आयकर आणि दोन टक्के विक्रीकर सुध्दा वसूल करण्यात आला नाही. या कामात वापरलेल्या सिमेंटच्या दर्जाबद्दल पीआरसीने आक्षेप नोंदविला आहे. तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथे २०१२-१३ मध्ये प्राथमिक आरोग्यकेंद्र बांधण्यात आले. या कामावर २५.५० लाख रूपये खर्च करण्यात आला. याकामातही सिमेंटच्या दर्जाबाबत ठपका ठेवण्यात आला आहे. लेखासंहितेचा नियमभंग करून निविदा मंजूर करण्यात आली. यासोबतच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यानी दिलेल्या तांत्रिक नियमानुसार मंजुरी घेण्यात आली नाही. विशेष म्हणजे या बांधकामाची मूळ नस्ती पीआरसीसमोर सादर करण्यात आली नाही. याशिवाय निविदा पुस्तिकेचे प्रत्येक पान कार्यकारी अभियंत्याच्या स्वाक्षरीनिशी प्रमाणित केले नाही. कमी अधिक प्रमाणात जि.प.च्या बांधकाम विभागामार्फत झालेल्या सिमेंटच्या दर्जाबाबत आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. येथे झाली अनियमितता नानोरी येथील उपकेंद्राचे बांधकाम, धानोरा येथील वाहनतळ, माधान भक्तनिवास बांधकाम, चिंचोली ते वरूडा रस्ता सुधारणा,चिखलदरा पंचायत समिती प्रशासकीय इमारतीचे बांधकाम, शेळघाट येथील सिमेंट काँक्रीट रस्ता, धारणीतील तारूबांधा येथील सिमेंट काँक्रीट रस्ता, आळी ते पिंपाझरी डांबरीकरण, बलूृमगव्हाण, पळसखेड येथील पशुवैद्यकीय दवाखाना, रामा ते बोराळा रस्त्याची दुरूस्ती, धारणी तालुक्यातील खारी पोच मार्ग, तिवसा तालुक्यातील बिच्चूखेडा पोचमार्ग आदी ठिकाणच्या कामावर पंचायतराज समितीने ठपका ठेवला आहे.