शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

..अखेर ‘त्या’ सात अपात्र नगरसेवकांना दिलासा

By admin | Updated: January 31, 2015 00:55 IST

महापालिकेतील सात नगरसेवकांनी निवडणूक खर्चाचा हिशेब वेळेपुर्वी सादर न केल्या प्रकरणी त्यांच्यावर झालेल्या अपात्रतेच्या कारवाईबाबत मुंबई ..

अमरावती : महापालिकेतील सात नगरसेवकांनी निवडणूक खर्चाचा हिशेब वेळेपुर्वी सादर न केल्या प्रकरणी त्यांच्यावर झालेल्या अपात्रतेच्या कारवाईबाबत मुंबई उच्च न्यायालताच्या नागपूर खंडपीठाने दिलासा दिला आहे. त्यामुळे या नगरसेवकांना अपात्रतेच्या टांगत्या तलवारीतून मुक्तता मिळाली आहे, हे विशेष.सन २०१२ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत विजयी उमेदवारांच्या खर्चाचे विवरण येथील विभागीय आयुक्तांनी तपासले असता सात नगरसेवकांनी वेळेच्या आत खर्चाची माहिती दिली नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या सातही नगरसेवकांना नोटीस बजावून खर्चाबाबतचे विवरण सादर करण्याची संधी दिली होती. परंतु शिवसेनेचे दिंगबर डहाके, भाजपचे चंदुमल बिल्दाणी, राष्ट्रवादीचे निलीमा काळे, ममता आवारे, रिपाइं (गवई गट) चे भूषण बनसोड, काँग्रेसच्या रहेमाबी तर बसपाच्या अल्का सरदार यांनी खर्चाचे विवरण सादर केले नाही.त्यामुळे तत्कालीन विभागीय आयुक्तांनी या सातही नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई केली होती. मात्र या निर्णयाविरुद्ध या सातही नगरसेवकांनी राज्य निवडणूक आयोगाकडे दाद मागितली होती. त्यानुसार नीला सत्यनारायण यांनी नगरसेवकांची बाजू ऐकून घेत तांत्रीक कारणांचा दाखला देऊन विभागीय आयुक्तांचा निर्णय रद्द केला होता. मात्र हा निर्णय राजकीय दबावातून झाल्याचा आरोप करीत पराभूत उमेदवार राजू चौथमल यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. वादी, प्रतिवादी अशा दोन्ही बाजू ऐकून घेत राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय कायम ठेवत उच्च न्यायालयाचे न्या. चांदूरकर यांनी सातही नगरसेवकांना दिलासा दिला आहे. राजू चौथमल यांची बाजू अ‍ॅड. प्रवीण वाठोडे तर सात नगरसेवकांची बाजू अ‍ॅड. एम. जी. भांगळे, किशोर शेळके यांनी मांडली. महापालिकेतर्फे अ‍ॅड. स्वप्नील शिंगणे यांनी काम पाहिले. या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त होत आहे.