शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

अखेर तत्कालीन शिक्षण उपसंचालकांना सहा वषार्नंतर मिळाला न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:15 IST

अमरावती : येथील शिक्षण उपसंचालक राम पवार यांना विविध आरोपांवरून सेवानिवृत्तीच्या अवघ्या १५ दिवसांपूर्वी तत्कालीन शिक्षण आयुक्तांनी निलंबनाची कारवाई ...

अमरावती : येथील शिक्षण उपसंचालक राम पवार यांना विविध आरोपांवरून सेवानिवृत्तीच्या अवघ्या १५ दिवसांपूर्वी तत्कालीन शिक्षण आयुक्तांनी निलंबनाची कारवाई केली होती. या निर्णयाविरुद्ध पवार यांनी ‘मॅट’मध्ये धाव घेतली होती. अखेर सहा वर्षांनंतर न्याय मिळाला असून, ज्यांनी आरोप करून फसविण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याविरुद्ध दोन कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा करणार, अशी माहिती पत्रपरिषदेत राम पवार यांनी दिली.

राम पवार यांच्या माहितीनुसार, अमरावती येथे शिक्षण उपसंचालक कार्यरत असताना तत्कालीन शिक्षणमंत्र्यांचे खासगी सचिव विद्याधर महाले यांनी बुलडाणा येथील वेतन पथक कार्यालयातील एका कर्मचाऱ्याची बदली करण्यासंदर्भात सांगितले होते. मात्र, डिसेंबर महिन्यात कोणत्याही कर्मचाऱ्यांची बदली करता येत नसल्याने ती बदली केली नव्हती. परिणामी महालेयांनी त्यावेळी ‘अद्दल’ घडवू अशी धमकी दिली होती, असा आरोप पवार यांनी केला. तत्कालीन शिक्षण आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनीसुद्धा महाले यांनी निलंबित करण्याचे निर्देश दिले होते तसेच सेवानिवृत्ती मिळू देणार नाही, अशी धमकी विद्याधर महाले यांनी दिली होती, असा आरोप पवार यांनी केला आहे. सन २०११-१२ मध्ये काही शाळांमध्ये पटपडताळणीत अनिमितता आढळून आल्याने संस्थाचालकांवर कारवाई केली होती. या प्रकरणात काही सत्यता नसलेले आरोप ठेवून ३१ ऑगस्ट २०१५ रोजी सेवानिवृत्ती होणार असल्याचे माहीत असताना चौकशी अहवालाचा फार्स रचून ७ ऑगस्ट रोजी निलंबन करण्यात आले. निलंबन कारवाईविरोधात मॅटमध्ये धाव घेतली आणि वस्तुस्थिती लक्षात आणून दिली. त्यामुळे ३१ ऑगस्ट रोजी रुजू झालो आणि त्याच दिवशी सेवानिवृत्त झालो, असे राम पवार म्हणाले.

पत्रपरिषदेला सेवानिवृत्त शिक्षण सहसंचालक संजय गणोरकर, राम आडे, हिरालाल जाधव, सुशीलकुमार पाटील, माजी शिक्षणाधिकारी सी.आर. पाटील आदी उपस्थित होते.

------------------

शासनाच्या समितीकडूनही ‘क्लीन चिट’

माझ्यावर लावण्यात आलेल्या दोषारोपाची चौकशी करण्यासाठी शासनस्तरावरील अधिकाऱ्यांची समिती गठित करण्यात आली होती. यात प्राथमिक चौकशी, अहवालातील मुद्दे आणि दोषारोपातील बाबी यात तफावत असल्याचे दिसून आले, असे राम पवार यांनी सांगितले. राज्य शासनाने खातरजमा आणि कागदपत्राच्या आधारे मला ‘क्लीन चिट’ दिली असृून, १७ ऑगस्ट २०२१ रोजी तसे पत्र अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांचे प्राप्त झाले आहे.

000000000000000