शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस अधीक्षकांविरुद्ध हक्कभंग तक्रार दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:10 IST

परतवाडा : मेळघाट विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजकुमार पटेल यांनी सोमवारी विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे जिल्हा ग्रामीण पोलीस ...

परतवाडा : मेळघाट विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजकुमार पटेल यांनी सोमवारी विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी एन यांच्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव दाखल केला. त्यामुळे चिखलदरा येथील पोलीस विश्रामगृहाच्या उद्घाटनाचा सामना अजूनच रंगला आहे.

महाराष्ट्र विधानसभा नियम २७३ व २७४ अन्वये विशेषाधिकार हक्कभंग प्रस्ताव आ. पटेल यांनी दाखल केला. चिखलदरा येथे पोलीस अधिकारी, कर्मचारी निवासस्थानाच्या नूतन इमारतीच्या २७ जूनच्या लोकार्पण सोहळ्याला स्थानिक आमदार असूनही निमंत्रित केले नाही. सदर बाबतीत माझ्या विशेषाधिकाराचा हक्कभंग झाला आहे. या प्रकारास जबाबदार असलेले पोलीस अधीक्षकांविरुद्ध मी याद्वारे हक्कभंग सूचना देत असल्याचे पत्रात त्यांनी नमूद केले.

दरम्यान, आ. राजकुमार पटेल यांना हेतुपुरस्सर डावलल्याचा आरोप करीत धारणी, चिखलदरा व परतवाडा येथे प्रहार कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवून तहसीलदारांना निवेदन दिले. चिखलदऱ्यात विनोद लांजेवार, मोग्या बेठेकर, रावजी मावस्कर, परसराम बेठे, शिवदास बडोदे, मंगल कासदेकर, हिराजी कासदेकर, सुनील उईके, बबलू पिपरदे, गुरुदेव भलावी, सुरेश बेलसरे मारुती गायन, फिरोज खान, जफर पठाण, परसराम गाठे, परतवाडा येथे अंकुश भिडकर, संजय उगले, गंगा धडारे, गणेश सोनवणे, शेख साजिद, सतीश पळसपगार, अभिश वानखडे, सुलतान पटेल, आशिष काळे, धारणी येथे प्रकाश घाडगे, श्रीपाल पाल, विनोद वानखडे, सचिन पटेल, उपसभापती जगदीश हेकडे, शैलेश मालवीय, रोहित पटेल, अशोक ठाकूर, विशाल कारवे, बंटी ठाकूर, वाहीद खान, सुमीत चौतमाल, ऋषभ घाडगे, कमल ठाकूर आदी सहभागी झाले.