शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

‘रघुवीर’वर एफडीएची धाड

By admin | Updated: September 16, 2016 00:57 IST

शहरातील प्रतिष्ठित रघुवीर प्रतिष्ठानातील कचोरीत बुधवारी अळ्या आढळल्यानंतर शहरात एकच

कचोरीत अळी : साहित्याचे नमुने जप्त, प्रयोगशाळेत रवाना अमरावती : शहरातील प्रतिष्ठित रघुवीर प्रतिष्ठानातील कचोरीत बुधवारी अळ्या आढळल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली. विश्वासार्हतेची आणि चवीची हमी देणाऱ्या रघुवीर प्रतिष्ठानातच निष्काळजीपणाचा कळस असल्याची बाब यामुळे सिद्ध झाली. ज्या ग्राहकाने खरेदी केलेल्या कचोरीत अळी आढळली त्या बंडू उर्फ गजानन माधव बाबरेकर यांनी याप्रकाराची एफडीआयकडे रितसर तक्रार केल्यानंतर आज शाम चौकातील रघुवीर प्रतिष्ठानावर एफडीआयच्या अधिकाऱ्यांनी गुरूवारी धाड टाकून येथील खाद्यपदार्थांसह रॉ मटेरियल्सचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत. अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी रघुवीरच्या किचन रूममधून अन्न पदार्थांचे तीन नमुने जप्त केले असून ते येथील आरोग्य प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. रघुवीर प्रतिष्ठानातील महागडा नाश्ता म्हणजे शुद्धता आणि चवदारपणासाठी जिल्ह्यातच नव्हे तर अन्य प्रांतातही प्रसिद्ध आहे. येथून कचोरी, समोसा आणि सांभारवडीच्या पार्सली बाहेरगावी जातात. अंबानगरीत आलेल्या पाहुण्यांना यजमान हमखास रघुवीरच्या पदार्थांची चव चाखवतात. मात्र, आतापर्यंत रघुवीर प्रतिष्ठानाने ग्राहकांच्या आरोग्याशी कसा खेळ चालविला होता, याचाच प्रत्यय या घटनेवरून आला आहे. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊन शुद्ध व दर्जेदार साहित्य वापरणे, स्वच्छतेच्या उपाययोजना करणे गरजेचे असताना रघुवीर प्रतिष्ठानने मात्र सर्व नियम धाब्यावर बसवून खाद्यपदार्थांची विक्री चालविल्याचा निष्कर्ष या घटनेवरून काढला जाऊ शकतो. शुद्धतेची हमी देणाऱ्या रघुवीरचा कारभार ‘उपर से टामटुम’ असाच सुरू असल्याचे दिसते. बुधवारा परिसरातील रहिवासी बंडू बाबरेकर यांनी खरेदी केलेल्या कचोरीत बोटाच्या कांड्याएवढ्या लांबीची अळी सापडल्यानंतर त्यांनी याची तक्रार एफडीएकडे केली. पश्चात एफडीएचे सहायक आयुक्त जयंत वाणे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नसुरक्षा अधिकारी विश्वजीत शिंदे व रावसाहेब वाकोडे यांनी बुधवारी दुपारी १ वाजताच्या दरम्यान ‘रघुवीर’ प्रतिष्ठानावर धाड टाकली. सांगा विश्वास ठेवायाचा कसा? ४रघुवीर स्वीटमार्ट व मिठाई सेंटरच्या शहरभर शाखा आहेत. हे प्रतिष्ठान शहरातील विश्वसनीय प्रतिष्ठानांपैकी एक मानले जाते. परंतु बुधवारी कचोरीत अळ्या आढळल्यानंतर येथील खाद्यपदार्थांवर विश्वास ठेवायचा कसा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दररोज लाखोंची उलाढाल असणाऱ्या रघुवीर सेंटरचे संचालक ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्यात अपयशी ठरले आहेत. हलगर्जीपणा केल्यामुळे कचोरीत अळी आढळली. हा लोकांच्या जीविताशी खेळच असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.