शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

ऑटो-मिनीडोअरमध्ये भीषण अपघात

By admin | Updated: June 7, 2014 00:43 IST

ऑटो-मिनीडोअरमध्ये झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला.

एक ठार, एक गंभीर : मासोद येथील घटनाअमरावती : ऑटो-मिनीडोअरमध्ये झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. शिरजगाव पोलीस ठाण्यांतर्गत मासोदजवळ शुक्रवारी  सकाळी १0 वाजता ही घटना घडली. शोभा बापुराव राऊत (५६) असे मृताचे तर पंकज महादेव राऊत (३0) असे जखमीचे नाव आहे.कुर्‍हा येथील रहिवासी शोभा राऊत व पंकज राऊत यांच्यासह ७ जण शुक्रवारी सकाळी १0 वाजता ऑटोने चांदूरबाजार येथे दादाराव राऊत यांच्या  मुलीच्या विवाह संमारंभाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निघाले होते. मासोद गावाजवळ त्यांच्या ऑटोला विरुद्ध दिशेने येणार्‍या  एम.एच.२७-४0४९ क्रमांकाच्या मिनीडोअर चालकाने जबर धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, यामध्ये ऑटोच्या दर्शनी भागाचा चुराडा  होऊन  शोभा व पंकज हे गंभीर जखमी झाले. हा अपघात पाहण्यासाठी अनेक बघ्यांची गर्दी उसळल्याने या मार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली  होती. घटनेची माहिती शिरजगाव पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी  जखमींना चांदुर बाजार येथील उपजिल्हा  रुग्णालयात दाखल केले. त्यांची  प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु उपचारादरम्यान शोभा  यांचा मृत्यु झाला. (प्रतिनिधी)रुग्णवाहिका बनली शो पीसजखमी शोभा व पंकज यांची  प्रकृती चिंताजनक असल्यामुळे  त्यांना  एम.एच.४0 सी एल 0५२६ क्रमांकाच्या शासकीय रुग्णवाहिकेने जिल्हा सामान्य  रुग्णालयात आणले. जखमींना  डॉक्टरांनी सलाईन देऊन जिल्हा सामान्य रुगाणालयात पाठविले नाही. हा हलगर्जीपणा पाहुन अतिदक्षता कक्षातील  डॉक्टरांनी रुग्णवाहिकेत डॉक्टर महिलेला दम दिला.१0८ क्रमांकाची रुग्णवाहिका ही तत्काळ सेवा देण्यासाठी सेवेत आहे. या रुग्णवाहिकेत चांदूरबाजार येथून जखमींना आणण्यात आले. परंतु त्यांना  कर्तव्यावर असणार्‍या डॉक्टरांनी आयव्ही (सलाईन) लावली नाही. रुग्णवाहिकेत रुग्णांना आणताना त्यांना आवश्यकतेनुसार सलाईन लावणे गरजेचे  आहे. परिणामी यामध्ये एखाद्या रुग्णाचा जीव धोक्यात येऊ शकतो.-डॉ.ज्योत्स्ना किटुकले,जिल्हा सामान्य रुग्णालय