शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

छत्री तलावातील गाळ पोहोचला शेतकऱ्यांच्या दारी

By admin | Updated: June 14, 2015 00:19 IST

शहराचे वैभव असलेल्या ब्रिटिशकालीन छत्रीतलावात अनेक वर्षांपासून साचलेला जवळपास २२०० ट्रक गाळ काढून..

युवा स्वाभिमानचा पुढाकार : पाणी पातळीत वाढअमरावती : शहराचे वैभव असलेल्या ब्रिटिशकालीन छत्रीतलावात अनेक वर्षांपासून साचलेला जवळपास २२०० ट्रक गाळ काढून तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला. युवा स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यासाठी पुढाकार घेतला. शहरातील एक प्रमुख पिकनिक स्पॉट म्हणून विकसित झालेल्या छत्री तलावातील गाळ अनेक वर्षांपासून काढण्यात न आल्याने या तलावाची पाणी पातळी कमी होत चालली होती. छत्री तलावाचे संवर्धन करण्यासाठी या तलावातील गाळ काढून तो शेतकरी, कुंभार व वीटभट्टी धारकांपर्यंत पोहोचविण्यात आला. गाळ काढल्यामुळे छत्री तलावाची पाण्याची पातळी वाढली आहे. त्याचप्रमाणे डोळ्यात समावेल एवढा तलावाचा घेर दिसू लागला आहे. शिवाय निघालेल्या गाळाचा लाभ शेतकऱ्यांना, वीटभट्टीधारकांना देण्यात आला आहे. आ. रवी राणा यांनी महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्यासमवेत छत्री तलाव परिसराची पाहणी केली. विकासाच्या पुढच्या टप्प्यात छत्री तलावला मुंबईच्या चौपाटीचे स्वरूप देण्याचा प्रयत्न असून यासाठी योजना आखल्या जातील, असे आयुक्त गुडेवार यांनी स्पष्ट केले. छत्री तलाव हे अमरावती शहराचे भूषण आहे. अनेक लोक लहान मुलांना घेऊन छत्री तलाव परिसरात मनोरंजनासाठी येतात. त्यामुळे या तलावाचे संवर्धन करण्याची गरज ओळखून या तलावातील गाळ व कचरा स्वच्छ करण्यात आला. यापुढे छत्री तलावाचा संपूर्ण कायापालट करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्त चंंद्रकांत गुडेवार यांनी दिले. आ. रवी राणा यांनी छत्री तलाव परिसरात मुंबई येथील चौपाटीच्या धर्तीवर नाना-नानी पार्क बनविण्याची संकल्पना मांडली. या संकल्पनेसाठी संपूूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन गुडेवार यांनी दिले. यावेळी विनोद जायसवाल, शैलेंद्र कस्तुरे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)