रामापूर-बेलजचा पुरवठा बंद : पिके आॅक्सिजनवर अचलपूर : रामापूर-बेलज येथे गेल्या सहा दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने पाण्यासाठी हाहाकार उडाला आहे. अंकुर फुटलेली पिके होरपळू लागल्याने संतप्त नागरिकांनी मंगळवारी दुपारी १२ वाजता परतवाडा येथील विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केली.रामापूर-बेलज या एक हजार लोकवस्तीच्या गावात पाणी पुरवठ्यासाठी टाकी नाही. गावात एकमेव असलेल्या बोअरवेलमधून पाणीपुरवठा केला जातो. गावात कमी क्षमतेच्या ट्रान्सफार्मरवर अतिरिक्त १२ कनेक्शन ३ फेजचे आहेत. त्यामुळे लाईन ड्रीप होऊन वीजपुरवठा वारंवार खंडित होतो. गेल्या सहा दिवसांपासून हा प्रकार सुरु आहे. पावसाने दडी मारल्याने व शेतीचे ओलित होत नसल्याने शेतातील पिकेही करपू लागली आहे. त्यामुळे आधीच हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना गावात पिण्याचे पाणीही उपलब्ध होत नसल्याने नागरिक चांगलेच संतापले आहेत. अभियंत्याने काढला पळनागरिकांना विजेच्या समस्येविषयी उत्तरे देतांना अभियंता कुटे यांची तारांबळ उडाली होती. कमी क्षमतेचे ट्रान्सफार्मर बदलविण्याविषयी समाधान न केल्याने नागरिक चिडले व कुटे यांनी आपल्या कक्षातून पळ काढला.पोलिसात तक्रार, गुन्हा दाखलरामापूर-बेलज येथील शेतकरी व नागरिकांची समजूत घालून वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता संजय कुटे यांनी शाखा अभियंता खवसे यांना सबंधित तक्रारनिवारण करण्यासाठी गावकऱ्यांसह पाठविले. आपण स्वत: न्यायालयीन कामानिमित्त गेलो. परंतु त्यानंतर कार्यालयात अचानक तोडफोड करण्यासह काच फोेडल्याची तक्रार पोलिसात केल्याचे कुटे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी केली परतवाडा वीज कार्यालयाची तोडफोड
By admin | Updated: August 19, 2014 23:25 IST