शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी उत्पादित मालाची थेट ग्राहकांना विक्री

By admin | Updated: May 3, 2017 00:18 IST

सध्याची बाजार व्यवस्था मध्यस्थ दलालांच्या साखळीमुळे खिळखिळी झाली आहे.

धान्य महोत्सव : ग्राहकांना मिळतेय विनाभेसळ धान्य, शेतकऱ्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्नअमरावती : सध्याची बाजार व्यवस्था मध्यस्थ दलालांच्या साखळीमुळे खिळखिळी झाली आहे. त्यामुळे शेतकरी ते थेट ग्राहक विक्री अशी संकल्पना जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर ‘फ्रेंड्स फॉर फ्रेंड्स’ या संस्थेने शेतकऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी २९ एप्रिलपासून गर्ल्स हायस्कूल चौकातील शाश्वत कन्सेप्ट स्कूलच्या आवारात ‘धान्य महोत्सव’ आयोजित केला आहे. हा महोत्सव ५ मे पर्यंत चालणार आहे. शासनाचे कुठलेच अनुदान न घेता शेतकऱ्यांनी केलेल्या नैसर्गिक उत्पादनांची ग्राहकांपर्यंत थेट व किफायतशीर भावात विक्री व्हावी, हा धान्य महोत्सवाचा प्रमुख उद्देश आहे. यापूर्वी आयोजित तांदूळ महोत्सवाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. त्याच धर्तीवर आता धान्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. अलिकडे शेतीमध्ये उत्पादनवाढीसाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खते व किटकनाशकांचा वापर केला जातो. दलाल साखळीला ब्रेकअमरावती : शेतमालाची मूळ चव नाहीशी होत आहे. मात्र, काही शेतकऱ्यांनी अद्यापही नैसर्गिक शेतीचा वारसा जपला आहे. वरूड तालुक्यामधील जायगाव येथील विजय पेलागडे यांनी नैसर्गिक शेतीमधून पिकविलेली डाळिंब विक्रीसाठी आणली आहेत. नागपूर जिल्ह्यातील मौदा येथील शंकर बोरीकर यांनी पिकविलेला सुगंधी ५५५ व बासमती तांदूळ, भंडारा जिल्ह्यातील सालेवाडी येथील कुशन टिचकुले यांच्या शेतातील चिकेट खंड्या व केसर तांदूळ, नांदगावातील मोरगाव येथील अनंत खंडारकर यांच्या शेतीमधील हळद, टाकरखेडा संभूतील अभिजित देशमुखांच्या शेतीमधील तूर डाळ, अमरावतीच्या श्रीकृष्ण घाटे यांनी गृह उद्योगातून तयार केलेले ११ प्रकारचे सरबत, आवळ्याचे विविध प्रकार, गुलकंद, कृषी समृद्धी शेतकरी कंपनीद्वारा गहू, डाळ व ज्वारी, मौदा येथील संजय ढोबळे यांच्या शेतीमधील चिन्नोर, जय श्रीराम व बासमती तांदूळ, उस्मानाबादच्या फारूक पटेल यांची गावरान ज्वारी, सिंदखेड राजा येथील प्रशांत काळबेंडे यांची न्यूसेलर वाणाची मोसंबी, भंडाऱ्याच्या इंदल बडवाईक यांच्या शेतीमधील ब्राऊन राईस व श्रीराम तांदूळ व अचलपूरच्या गौरव वानखडे यांच्या शेतामधील गावरान मूग, उडीद डाळ व बरबटी आदी उपलब्ध आहे. दलालमुक्त साखळी व शेतकऱ्यांच्या मालाची ग्राहकांना थेट विक्री ेकेल्यामुळे शेतकऱ्यांना व ग्राहकांना समान फायदा होत आहे. (प्रतिनिधी)झुणका-भाकर स्टॉलला अमरावतीकरांची दादधान्य महोत्सवात धान्य, फळांसोबतच झुणका-भाकरचे देखील स्टॉल आहेत महोत्सवात विक्रीसाठी उपलब्ध ज्वारीची भाकर आणि झुणका, दह्याचे बेसन, हिरव्या मिरच्यांचा ठेचा असा झणझणीत वऱ्हाडी थाट असणाऱ्या याकेंद्राला अमरावतीकरांनी उत्स्फूर्त दाद दिली आहे. विशेष म्हणजे या केंद्रात भाकरीसोबत भाज्यांचे मेन्यू रोज बदलतात त्यामुळे दररोज वेगळ्या भाजीची चव ग्राहकांना थाटता येत आहे.