शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची दिवाळी यंदा अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 06:00 IST

यंदा तालुक्यात मुबलक पाऊस बरसला. जिल्ह्यात अन्य १३ तालुक्यांच्या तुलनेत पावसाची टक्केवारी सरासरी १४० टक्क््यांवर पोहोचली. यामुळे रोखीचे पीक म्हणून ओळखले जाणारे कपाशी व सोयाबीन पीक चांगलेच बहरले होते. ९० दिवसांच्या कालावधीचे सोयाबीन पीक ऐन दिवाळी या महत्त्वाच्या सणाच्या वेळेस घरात येत असल्याने शेतकऱ्यांकडून या पिकाच्या लागवडीला प्राधान्य दिले जाते, तर कपाशीचा हंगाम मार्चपर्यंत लांबत असल्याने हे पीक शेतकऱ्यांकरीता पांढरे सोने म्हणून ओळखले जाते.

ठळक मुद्देसोयाबीन गेले : कपाशी वेचणी नाही

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : मान्सूनचे चार महिने संपुष्टात आल्यानंतर ऑक्टोबरच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात कोसळलेल्या पावसाने हातातोंडाशी आलेले सोयाबीन मातीमोल झाले आहे. त्यामुळे शुक्रवारपासून सुरू होत असलेल्या प्रकाशपर्व कसे साजरे करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. २५ ऑक्टोबरपासून दिवाळीला सुरुवात होत असताना, घरात ना सोयाबीन, ना कापूस; अशी शेतकऱ्याची झाली आहे.यंदा तालुक्यात मुबलक पाऊस बरसला. जिल्ह्यात अन्य १३ तालुक्यांच्या तुलनेत पावसाची टक्केवारी सरासरी १४० टक्क््यांवर पोहोचली. यामुळे रोखीचे पीक म्हणून ओळखले जाणारे कपाशी व सोयाबीन पीक चांगलेच बहरले होते. ९० दिवसांच्या कालावधीचे सोयाबीन पीक ऐन दिवाळी या महत्त्वाच्या सणाच्या वेळेस घरात येत असल्याने शेतकऱ्यांकडून या पिकाच्या लागवडीला प्राधान्य दिले जाते, तर कपाशीचा हंगाम मार्चपर्यंत लांबत असल्याने हे पीक शेतकऱ्यांकरीता पांढरे सोने म्हणून ओळखले जाते. त्यावर शेतकऱ्यांचे वर्षभराचे पुढील पेरणीचे नियोजन ठरलेले असते. यामुळे शेतकरी वर्ग या दोन्ही पिकांना आपली पहिली पसंती देतो. मात्र, यावर्षी परतीचा पाऊस अधिक लांबल्याने सोयाबीन पीक घरी आणण्यासाठी कापणी झालेली असताना मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. परतीच्या पावसाने अचानक हजेरी लावल्याने शेतात कापून ठेवलेले हे पीक पावसामुळे सडू लागले आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांना यंदाची दिवाळी साजरी करता येणार नाही, असे चित्र आहे. मतदानाच्या निकालाने तालुक्यात गजबजाट असला तरी पावसाने शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.मुलामुलींचे कपडे कसे घ्यायचे ?सोयाबीन या पिकावर अवलंबून असलेला शेतकरी दिवाळीत मुलामुलींच्या कपड्यालत्त्यासह कुटुंबातील विवाह प्रसंगाचे नियोजन करतो. मात्र, यंदा त्याचे स्वप्न या परतीच्या पावसात वाहून गेले आहे. यंदा पावसामुळे कपाशी पिकाच्या पाती गळू लागल्या, तर बोंडाची वाढ खुंटल्याने सीतादही होणे कठीण झाले आहे.

टॅग्स :DiwaliदिवाळीFarmerशेतकरी