शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी पुन्हा संकटात

By admin | Updated: July 23, 2014 23:23 IST

पावसाने मारलेल्या दडीमुळे जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त होता. दरम्यानच्या काळात दोन-तीन दिवस पावसाने हजेरी लावल्याने उत्साहाने शेतकऱ्यांनी पेरणी केली. परंतु त्यानंतर काही दिवस उलटत नाहीत

अमरावती : पावसाने मारलेल्या दडीमुळे जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त होता. दरम्यानच्या काळात दोन-तीन दिवस पावसाने हजेरी लावल्याने उत्साहाने शेतकऱ्यांनी पेरणी केली. परंतु त्यानंतर काही दिवस उलटत नाहीत तोच सोमवारपासून पावसाने मुसळधार हजेरी लावल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. संततधार पावसामुळे पेरलेले बियाणे दडपण्याची शक्यता असते. पावसाचे पाणी शेतात साचल्याने मातीचा थर बियाण्यांवर पसरून बियाणे नाश पावतात. बियाण्यांना अंकुर फुटत नाहीत. उत्पादनात घट येण्याची शक्यता असते. जिल्ह्यात सोयाबीनची पेरणी नुकतीच आटोपली आहे. मुसळधार पावसाचा परिणाम सोयाबीनवर होऊ शकतो. सोयाबीनचे बी ४ से.मी.पेक्षा अधिक खोल नको. मात्र, वेगवान पावसामुळे या पेरलेल्या बियाण्यांवर मातीचा थर साचण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुरीच्या उत्पादनावर मात्र या पावसामुळे विशेष दुष्परिणाम संभवत नाही. उगवत्या पेरणीसाठी मात्र हा पाऊस नुकसानदायी सिध्द होऊ शकतो. दुबार पेरणीचे संकटही शेतकऱ्यांवर येऊ शकते, अशी माहिती किटकतज्ज्ञ राजेंद्र जाणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. (प्रतिनिधी)