पुरात गेला युवक वाहून : चार लाखांची शासकीय मदत धामणगाव रेल्वे : बगाजी सागर धरणाचे अचानकपणे नऊही दरवाजे उघडण्यात आल्यामुळे आलेल्या महापुरात वाहून युवक वाहून गेला. घरातील कर्ता व्यक्ती गेल्याने त्या कुटुंबावर अवकला पसरली होती. त्या मृत युवकाच्या कुटुंबाला आ़ वीरेंद्र जगताप यांच्या पुढाकाराने भरीव मदत मिळाली आहे़ गत आठवड्यात तालुक्यातील वरूड बगाजी येथील नंदू केशवराव काष्टे हा युवक बगाजी सागर धरणाचे दरवाजे उघडल्याने पुरात वाहून गेला दरम्यान या कुटुंबाला शासनाने त्वरित आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आ़ वीरेंद्र जगताप यांनी केली होती़ मृत नंदू काष्टे यांच्या घरी जाऊन आ़वीरेंद्र जगताप यांनी त्यांच्या कुटुंबीयांना चार लाखांचा धनादेश दिला़ यावेळी तहसीलदार चंद्रभान कोहरे, पं़ स़ सदस्य संगीता निमकर, जि़ प़ सदस्या रंजना उईके, माजी पं़ स़ सदस्य रवी भुतडा, विजय निमकर, सतीश हजारे, राजू डाफ, सविता इंगळे, गुरूदास ढाकुलकर, शरद नेरकर, संजय निमकर, यांची उपस्थिती होती़ पावसाळ्याचे दिवस असताना बगाजी सागर प्रकल्पाच्या यंत्रणेने सतर्क राहून प्रथम दवंडी देणे गरजेचे आहे़ यानंतर अशी घटना पुन्हा घडू नये, याची दखल प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी आ़वीरेंद्र जगताप यांनी बगाजी सागर प्रकल्पाच्या प्रशासनाला पत्राद्वारे केली आहे़ (तालुका प्रतिनिधी)
‘त्या’ कुटुंबाला वीरेंद्र जगताप यांचा आधार
By admin | Updated: July 22, 2016 00:08 IST