शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

उच्चदाब वितरण प्रणाली योजनेच्या सुधारित प्रकल्प किमतीस मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:14 IST

अमरावती : उच्चदाब वितरण प्रणाली योजनेचा सुधारित खर्च ५०४८.१३ कोटींवरून ४७३४.६१ कोटी इतका करण्यास शासनाने १५ सप्टेंबर रोजी मान्यता ...

अमरावती : उच्चदाब वितरण प्रणाली योजनेचा सुधारित खर्च ५०४८.१३ कोटींवरून ४७३४.६१ कोटी इतका करण्यास शासनाने १५ सप्टेंबर रोजी मान्यता दिली आहे.

या योजनेला आता ३१ मार्च २०२३ पर्यंत मान्यता देण्यात आली आहे. उच्चदाब वितरण प्रणाली योजनेच्या सुधारित प्रकल्प किमतीस तसेच योजनेस शासनाने मुदतवाढ दिल्याने विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांना या योेजनेचा लाभ मिळणार आहे.

वितरण प्रणालीअंतर्गत ३१ मार्च २०१८ अखेर वीज जोडण्याकरिता प्रलंबित असणाऱ्या कृषिपंप अर्जदारांना वीजजोडण्या देण्याकरिता योजनेची मुदत ३१ मार्च २०२३ पर्यंत वाढविण्यास मान्यता देण्यात आली आहे.

विदर्भ व मराठवाडा विभागांतील सर्वसाधारण प्रवर्गातील मार्च २०१८ अखेर प्रलंबित कृषिपंप ऊर्जाकरणाकरिता लागणाऱ्या अनुदानामध्ये लेखाशीर्षानुसार ७८०.७३ कोटींची वाढ झाली असल्याने या वाढीव खर्चास मंजुरी देण्यात येत आहे. महावितरण कंपनीकडे उच्चदाब वितरण प्रणाली योजनेअंतर्गत आदिवासी विकास विभागाच्या शिल्लक अनुदान व उर्वरित वीज जोडण्या देण्याकरिता लागणारे अतिरिक्त अनुदान उर्वरित राज्यातील विदर्भ व मराठवाडा विभाग वगळून ३१ मार्च २०१८ अखेर पैसे भरून वीज जोडणीकरिता प्रलंबित असलेले अनुसूचित जमाती वर्गवारीतील कृषिपंप अर्जदारांना वीजजोडणी देण्याकरिता प्राधान्याने खर्च करण्याबाबत मान्यता दिली. तसेच कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० अंतर्गत धोरण कालावधीत १ एप्रिल २०१८ नंतरच्या वीजजोडणीकरिता प्रलंबित असणाऱ्या राज्यातील अनुसूचित जमाती वर्गवारीतील कृषिपंप अर्जदारांना वीजजोडणी देण्याकरिता या योजनेतून खर्च करण्याबाबतही मान्यता दिली.