शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
4
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
5
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
6
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
7
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
8
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
9
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
10
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
11
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
12
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
13
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
14
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
16
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
17
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
18
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
19
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
20
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
Daily Top 2Weekly Top 5

१.१० लाख शेतकऱ्यांना कर्ज भरण्यास मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:14 IST

अमरावती : जिल्हा बँकेसह व्यापारी बँकांनी शेतकऱ्यांना सन २०२०-२१ या वर्षात दिलेल्या पीक कर्जाच्या वसुलीस ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात ...

अमरावती : जिल्हा बँकेसह व्यापारी बँकांनी शेतकऱ्यांना सन २०२०-२१ या वर्षात दिलेल्या पीक कर्जाच्या वसुलीस ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. जिल्ह्यात किमान १.१० लाख खातेदारांना कर्ज भरण्यास एक महिन्याची मुदत मिळाल्याची माहिती डीडीआर यांनी दिली.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संचारबंदीच्या कालावधीत शेतकऱ्यांना शेतीमालाच्या विक्री व्यवस्थेतील अडचणी आल्या. जिल्हा बँका, व्यापारी बँकांमार्फत शेतकऱ्यांना पीक कर्जपुरवठा करण्यात येतो. जे शेतकरी बँकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड ३० जूनपर्यंत करतात, अशा शेतकऱ्यांना पीक कर्जाची विहित मुदतीत परतफेड करण्यासाठी व्याजामध्ये प्रोत्साहनपर सवलत देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना राबविण्यात येते. या वाढीव मुदतीत पीक कर्जाची परतफेड करणारे शेतकरी हे डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ मिळण्यास पात्र असतील. याबाबतचा शासनादेश प्राप्त झाल्याचे जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांनी सांगितले.

बॉक्स

जिल्हा बँकेचे ५२ हजार नियमित खातेदार

जिल्हा बँकेचे ५२ हजार शेतकरी हे नियमित खातेदार आहेत. यापैकी ४६ हजार खातेदारांनी कर्जाची परतफेड करून नव्याने कर्ज घेतले आहे. याशिवाय व्यापारी बँकांचे ५८ ते ६० हजार नियमित खातेदार आहेत. या सर्व खातेदारांना आता ३१ जुलैपर्यंत पीक कर्जाची परतफेड करता येणार आहे. या कालावधीत वसुलीस बँकांना मनाई करण्यात आल्याचे जिल्हा उपनिबंधकांनी सांगितले.

कोट

जिल्ह्यात साधारणपणे १.१० लाख शेतकऱ्यांना कर्ज मुदतवाढीचा फायदा मिळू शकतो. यापैकी काही शेतकऱ्यांनी नियमितपणे कर्ज भरणा केलेला आहे.

- संदीप जाधव, जिल्हा उपनिबंधक