शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दोन सदस्यांचे बहिर्गमन; महिला सदस्यांची नाराजी

By admin | Updated: August 18, 2015 00:25 IST

कर आकारणी, खड्डे तसेच जागा हस्तांतरणाविषयी चर्चा सुरु असताना काही ठरावीक सदस्यांना बोलण्याची संधी दिली जाते, ...

कार्यक्रम पत्रिका फाडली : महापौरांवर पक्षपाताचा आरोपअमरावती : कर आकारणी, खड्डे तसेच जागा हस्तांतरणाविषयी चर्चा सुरु असताना काही ठरावीक सदस्यांना बोलण्याची संधी दिली जाते, असा आरोप करून अंबादास जावरे, विजय नागपुरे यांनी विषयपत्रिकांच्या प्रती फाडून सभागृहातून बहिर्गमन केले, तर महिला सदस्यांनी महापौरांच्या दुटप्पी धोरणाचा निषेध नोंदविला.महापालिकेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सोमवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत कर आकारणीवरून जोरदार चर्चा करण्यात आली. यात बहुतांश सदस्यांनी मते नोंदविली. विजय नागपुरे, अंबादास जावरे हे दोन सदस्य मते मांडण्यासाठी माईकपुढे येताच महापौर चरणजित कौर नंदा यांनी त्यांना बसण्याचा सल्ला दिला. तेव्हा विजय नागपुरे यांनी ‘ मला का बोलू दिले जात नाही, मी या सभागृहाचा सदस्य नाही काय?’ असे म्हणत त्यांनी कार्यक्रम पत्रिका फाडून सभागृहातून बहिर्गमन केले. नागपुरे यांच्या आरोपानुसार काही सदस्यांना बोलण्याची संधी दिली जाते. महापौरांचे हे दुटप्पी धोरण संयुक्तिक नाही, असेदेखील नागपुरे, जावरे म्हणाले. गणेशोत्सवात खड्डे बुजविण्याचा विषय चर्चिला जात असताना अर्चना इंगोले, कांचन ग्रेसपुंजे यादेखील बोलण्यास उभ्या झाल्यात. परंतु या विषयावर बरेच सदस्य बोलले असून आता खाली बसा, असे महापौर नंदा म्हणाल्या. तेव्हा अर्चना इंगोले यांनी महापौरांच्या भूमिकेवर प्रचंड नाराजी व्यक्त केली. शेगाव मार्गावर मोठा खड्डा पडला असून तो जीवन प्राधिकरणाने दुरुस्त करावा, असे अपेक्षित असल्याची बाब त्यांनी उपस्थित केली. तसेच निर्मला बोरकर, कांचन ग्रेसपुंजे यांनी महिला सदस्यांना सभागृहात बोलू दिले जात नसल्याचा आरोप केला. येथील इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदर्र्यींकरणासाठी जागा हस्तांतरण करण्याचा निर्णय द्यायचा होता, तर एवढा वेळ चर्चेत घालविला कशाला, असा सवाल कांचन ग्रेसपुंजे यांनी महापौरांना केला. निर्मला बोरकर यांनी जागा हस्तांतरणाविषयी बोलण्याची संधी सोडली नाही. हा विषय कायम आणि मंजूर झाला असतानाही त्यांनी मत नोंदविले, हे विशेष. यावेळी महिला सदस्यांनी समान बोलण्याची संधी मिळावी, अशी मागणी केली. (प्रतिनिधी)शासन अधिकाऱ्यांवर एफआयआर का नाही?घोटाळे, भ्रष्टाचाराची प्रकरणे आयुक्त गुडेवारांनी उघडकीस आणून महापालिकेतील कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले आहे. भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. मात्र, शासनाचे अधिकारीदेखील यात सहभागी असताना त्यांच्यावर फौजदारी का दाखल केली नाही, असा सवाल दिंगबर डहाके यांनी उपस्थित केला. उपायुक्त, लेखापरीक्षक आणि लेखापाल हे शासनाचे अधिकारी असून तेसुध्दा जबाबदार आहेत, असे डहाके म्हणाले. विलास इंगोले, अरुण जयस्वाल, अजय गोंडाणे यांनीदेखील मत व्यक्त केले. डहाके यांनी आयुक्त गुडेवार यांना तुम्हच्यावरही सोलापुरात अपहार झाल्याचा आरोप असून एफआयआर दाखल होणे म्हणजे गुन्हेगार होत नाही, असे ते म्हणाले.