शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
4
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
5
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
6
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
7
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
8
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
9
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
10
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
11
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
12
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
13
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
14
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
15
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
16
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
17
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
18
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
19
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारीच्या मुद्यावरून उत्कंठा शिगेला

By admin | Updated: June 8, 2014 23:31 IST

सुनील देशमुख यांचे ऐनवेळी पंख छाटून राष्ट्रपती पुत्राला लाँच केल्यामुळे २00९ सालची अमरावती विधानसभेची निवडणूक देशभरात सर्वाधिक उत्कंठेची व प्रतिष्ठिेची ठरली होती. उमेदवार बदलाच्या मुद्यावरून

संजय खोडकेंच्या नावाची चर्चा भाजपातून गणेश देशमुख  -अमरावतीसुनील देशमुख यांचे ऐनवेळी पंख छाटून राष्ट्रपती पुत्राला लाँच केल्यामुळे २00९ सालची अमरावती विधानसभेची निवडणूक देशभरात सर्वाधिक उत्कंठेची व प्रतिष्ठिेची ठरली होती. उमेदवार बदलाच्या मुद्यावरून यावेळीही अमरावतीच्या वातावरणात उष्णता जाणवू लागली आहे. रावसाहेबांना तिकीट दिल्यावर काँग्रेसच्या कुणाही नेत्याला न जुमानणारे सुनील देशमुख निवडणुकीनंतर मात्र घराबाहेर निघालेच नव्हते. महापालिका निवडणुकीदरम्यान त्यांनी स्थापन केलेली जनविकास काँग्रेस ही अल्पायुषी राजकीय घडामोड वगळता, राजकीय संन्यास घेतला असावा, अशीच सुनील देशमुखांची एकंदर वागणूक होती. आपला नेता राजकीय हालचालीच करीत नाही म्हटल्यावर त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी स्वत:चे पुनर्वसन करवून घेतले. तरीही शांतच असलेले सुनील देशमुख लोकसभा निवडणुकीपासून अचानक सक्रिय झाले आहेत. पाच वर्षे कमालीचे शांत असलेल्या सुनील देशमुखांनी सारी शक्ती आगामी विधानसभा आखाड्यासाठीच तर राखून ठेवली नव्हती ना, असा प्रश्न त्यांच्या अंतर्गत सक्रियतेचा वेग बघितल्यावर मनाला स्पशरून जातो. लोकसभा निवडणुकीदरम्यान सुनील देशमुख यांच्या काँग्रेस प्रवेशाची तारीखही निश्‍चित झाली होती. निवडणुकीच्या धामधुमीत पक्षप्रवेश  केल्यास हवे तसे मायलेज मिळणार नाही, हे हेरून त्यांनी निवडणुकीनंतर काँग्रेस प्रवेश करण्याचा बेत मनी आखला होता. तथापि, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसविरुद्धचा संताप इतका उफाळलेला दिसला की, निष्कासनाच्या कारवाईनंतरही मी काँग्रेसच्याच विचारधारेचा, असे कायम सांगत आलेले सुनील देशमुखही डगमगले. अच्छे दिनच्या काही जाहिरातींवर त्यांची प्रतिमा म्हणूनच अंकित झाल्याचे बघता आले. गॉडफादर विलासराव देशमुखांच्या जाण्याने आधार गमावलेल्या सुनील देशमुखांचे स्थानिक काँग्रेसमध्ये शत्रुच अधिक आहेत. आता भाजपक्षाच्याच तिकिटावर दंड थोपटणे सर्व दृष्टीने सुज्ञ निर्णय असेल, अशा निर्णयाप्रत सुनील देशमुख पोहोचले आहेत. भाजपक्षाच्या काही बड्या नेत्यांशी त्यांचा संपर्क सुरू आहे. रावसाहेब शेखावतांनी अमरावती विधानसभेसाठी नियोजनबद्ध कार्य बर्‍याच दिवसांपासून सुरू केल्यामुळे ते अमरावतीतून लढणार की, जळगाव जिल्ह्यातून ही मध्यल्या काळात अचानक सुरू झालेली चर्चा आता निर्थक ठरली आहे. प्रतिस्पध्र्यांच्या तुलनेत रावसाहेबांचा राजकीय अनुभव तसा खूप जास्त नसला तरी त्यांच्या पाठीशी काँग्रेस पक्षाचे दिग्गज आणि धुरंदर आहेत. दांडगा अनुभव नसला तरी ज्यांच्याजवळ तो आहे, अशांचे मार्गदर्शन रावसाहेबांना सहज उपलब्ध आहे. त्या-त्या क्षेत्रातील जाणकारांशी चर्चा करणे, मुद्दे समजवून घेणे, काही महत्त्वाचे वाटल्यास त्याची नोंद घेणे, ही रावसाहेबांच्या राजकारणातील जमेची बाजू. सुनील देशमुख यांनी टाकलेला प्रत्येक डाव कसा निकामी करायचा हे ठरविण्यासाठी रावसाहेबांकडे ब्रेन्स आहेत. रावसाहेबांनी विधानसभेच्या रणांगणावर रोवलेली नजर शक्ती आणि युक्तीची आहे. मोदींच्या लाटेमुळे आता शिवसेना आणि भाजपक्षाचा उत्साह कमालीचा ओसंडून वाहतोय. विधान परिषदेवर निवडून आलेले प्रवीण पोटे भाजपचे एकुलते एक आमदार. २0१४ सालचा अमरावती शहरातील आमदार भाजपक्षाचाच असेल, असे वक्तव्य आमदार होण्यापूर्वीच त्यांनी ज्या विश्‍वासाने केले होते, त्याचवेळी कुछ कर गुजरने की तमन्ना अधोरेखित होत होती. आता तर भाजपक्षाचा सुवर्णकाळच अवतरला आहे. गडकरींच्या जवळचे असलेले पोटे अमरावती शहर ताब्यात घेण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करीत आहेत. मोदींची सभा आयोजित करणारे भाजपक्षाचे खंबीर कार्यकर्ते, आरएसएसचे काही जुणेजाणते भगवा रोवण्यासाठी पोटेंच्या सोबतीला आहेतच. खासदार आनंदराव अडसूळ निवडून आल्यानंतर शिवसेनेच्या गोटातील उत्साह कमालीचा दुणावला आहे. पूर्वी अमरावती विधानसभेसाठी विचारच न करणारे शिवसेना नेते आता अमरावतीत शिवसेनेचा आमदार असावा, अशी मनीषा बाळगून आहेत. स्वतंत्र लढण्याची तयारी सुरू झालेली आहे. बडनेर्‍यातून रिंगणात उतरण्यासाठी सज्ज असलेले दिगंबर डहाके, संजय बंड, तसेच माजी खासदार अनंतराव गुढे या नावांची  चर्चा सेनेच्या विविध गोटांतून अमरावती विधानसभेसाठी सुरू झालेली आहे.