शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

आरोपाने व्यथित सीईओंचे सभेतून बहिर्गमन

By admin | Updated: July 30, 2016 00:06 IST

भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप जि.प.सदस्यांनी केल्याने व्यथित झालेले जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांनी चक्क सभेतून बहिर्गमन केले.

जिल्हा परिषद : स्थायी समिती सभेतील प्रकारअमरावती : भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप जि.प.सदस्यांनी केल्याने व्यथित झालेले जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांनी चक्क सभेतून बहिर्गमन केले. शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत हा प्रकार घडला. जिल्हा परिषदेच्या इतिहासातील ही एकमेव घटना असावी. सीईओंचा संताप बघून जि.प.पदाधिकारी व सदस्यांनी त्यांना जाहीर माफी मागून सभागृहात परत आणले. नांदगाव खंडेश्र्वर तालुक्यातील रोजगार हमी योजनेच्या कामात झालेल्या अनियमिततेचे प्रकरण काही महिन्यांपासून स्थायी समितीत गाजत आहे. जि.प. सदस्यांच्या मागणीनुसार सीईओंनी याप्रकरणात स्वत: लक्ष घालून अधिनस्थ अधिकाऱ्यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यासाठी त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांच्या बैठकी घेतल्यात. मात्र, यातून कोणतेच तथ्य निघाले नसल्याचे मत सदस्य रवींद्र मुंदे यांनी यावेळी व्यक्त केले. या अनियमिततेकडे प्रशासनाचे प्रमुख म्हणून सीईओंचे लक्ष नाही. ते भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप मुंदे यांनी केला. यामुळे सीईओंचा पारा चढला आणि मुदेंच्या वक्तव्यावर प्रखर उत्तर दिले. ते म्हणाले, ‘साहेब, उभ्या आयुष्यात कधीही भ्रष्टाचार केला नाही आणि करू दिला नाही. हिंमत असेल तर आरोप सिद्ध करा. माझ्या कार्यप्रणालीवर संशय असेल तर अविश्वास आणा’. तत्पूर्वी उपाध्यक्ष सतीश हाडोळे यांनी सभागृहाच्यावतीने जाहीर माफी मागितली. सीईओंचा संताप पाहून काँग्रेसचे गटनेता बबलू देशमुख, प्रताप अभ्यंकर, गिरीश कराळे, सतीश हाडोळे अभिजित ढेपे यांनी सीईओंची बाहेर जाऊन समजूत काढली व मनधरणी करून त्यांना सभागृहात परत आणले. परिणामी सभेतील इतर मुद्यांवरील चर्चा मागे पडले. या घटनेनंतर अर्ध्या तासांत ही सभा गुंडाळण्यात आली. मात्र, जिल्हा परिषदेच्या आवारात सभेतील हा विषय बराच काळ चघळला गेला. (प्रतिनिधी)प्रशासकीय सेवेत आलो तेव्हापासून नव्हे त्याआधीपासून कधीही भष्ट्राचार केला नाही आणि कुणालाही पाठबळ दिले नाही. ती माझी संस्कृती नाही. तरीही ज्यांना कुणाला असे वाटत असेल त्यांनी असले आरोप सिद्ध करावेत आणि मगच बोलावे. असे आरोप कदापीही खपवून घेणार नाही.सुनील पाटील, मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदमग्रारोहयोचा लाभ मिळवून देण्याकरिता नांदगाव पं.स.मध्ये पैसे मागितले जातात. या प्रकरणाची चौकशी होवून दोषींवर कारवाई व्हायला हवी होती. मात्र, ती झाली नाही. त्यामुळे अपहार करणाऱ्यांना सीईओ खतपाणी घालतात का, असा सवाल मी उपस्थित केला. सीईओंवर भष्ट्राचाराचा आरोप केला नाही. -रविंद्र मुंदे जिल्हा परिषद सदस्य