शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

सन्मती अभियांत्रिकीचे परीक्षा केंद्र होणार रद्द; त्रिसदस्यीय समिती चौकशीची बैठक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 20:32 IST

इंजिनीअरिंग मॅकेनिक्सचा पेपर फुटल्यानंतर चौकशीसाठी गठित या समितीची तातडीची बैठक सोमवारी पार पडली. 

अमरावती : पेपरफूट प्रकरणात चर्चेला आलेल्या वाशिम येथील सन्मती अभियांत्रिकी महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र रद्द करण्याच्या निर्णयाप्रत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची त्रिसदस्यीय चौकशी समिती पोहोचली आहे. त्यावर लवकरच यावर शिक्कामोर्तब केला जाणार आहे. इंजिनीअरिंग मॅकेनिक्सचा पेपर फुटल्यानंतर चौकशीसाठी गठित या समितीची तातडीची बैठक सोमवारी पार पडली. 

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न सन्मती अभियांत्रिकी महाविद्यालयातील कर्मचारी बोरे आणि विद्यापीठातील अस्थायी कर्मचारी आशिष राऊत यांच्यात पेपरफूटसंदर्भात मिलिभगत असल्याचे प्राथमिक चौकशीअंती स्पष्ट झाले. त्यामध्ये सन्मती महाविद्यालयाचा सहभाग स्पष्ट झाला. अधिष्ठाता एफ.सी. रघुवंशी, प्राचार्य ए.बी. मराठे आणि परीक्षा व मूल्यांकन विभागाचे संचालक हेमंत देशमुख यांच्या त्रिसदस्यीय चौकशी समितीने पेपरफूटप्रकरणी युद्धस्तरावर चौकशी आरंभली आहे. आठ दिवसांत ही समिती वस्तुनिष्ठ अहवाल कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांना सादर करणार आहे. 

दरम्यान, ४ जून रोजी पार पडलेल्या सिनेट सभेत स्वत: कुलगुरू चांदेकर यांनी याप्रकरणी आठ दिवसांत चौकशी करून हे प्रकरण पोलिसांत देणार असल्याची ग्वाही सिनेट सभेत दिली आहे. विद्यापीठ प्रशासन याप्रकरणी काय करणार आहे, हे सिनेट सभेत रेकॉर्डिंग झाले आहे. त्यामुळे पेपरफूटप्रकरणी विद्यापीठाने सिनेट सभेत दिलेला शब्द पूर्ण करण्याची तयारी चालविली आहे. मात्र, महाराष्ट्र सार्वजनिक कायदा २०१६ नुसार कलम ४८, ५ (अ) अंतर्गत निर्णय घेऊन विद्यापीठ प्रशासन सन्मती अभियांत्रिकी महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र रद्द करणार असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली आहे.अस्थायी कर्मचा-यांनी हाताळले तीन अधिका-यांचे लॅपटॉपपेपरफूट प्रकरण उघडकीस येण्यापूर्वी विद्यापीठाच्या परीक्षा विभागात अस्थायी कर्मचारी विनय रोहणकर हा परीक्षा संचालकांना उजवा हात म्हणून वावरत होता. एवढेच नव्हे तर पीएचडी सेल विभागाचे सुजय बंड, परीक्षा विभागातील अधिकारी मालधुरे यांचेदेखील रोहणकर हा लॅपटॉप हाताळत होता. ई-मेल आयडीसुद्धा त्याला माहिती आहे. पेपरफूट प्रकरणानंतर आशिष राऊत आणि विनय रोहणकर या दोन्ही अस्थायी कर्मचाºयांना घरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. आशिष राऊत याचा मोबाईल विद्यापीठाने ताब्यात घेतला आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती