शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

नैतिक जबाबदारी म्हणून प्रत्येकाने झाडे लावावी

By admin | Updated: June 6, 2016 00:17 IST

पर्यावरणाच्या रक्षणासाठी अधिकाधिक झाडे लावण्याची गरज आहे.

पालकमंत्री : जागतिक पर्यावरण दिन उत्साहात अमरावती : पर्यावरणाच्या रक्षणासाठी अधिकाधिक झाडे लावण्याची गरज आहे. यासाठी आपापली जबाबदारी ओळखून समाजातील प्रत्येक नागरिकाने अधिकाधिक झाडे लावावीत व त्यांचे संगोपन, संवर्धन करावे, असे आवाहन पर्यावरण राज्यमंत्री तथा पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले. जागतिक पर्यावरण दिन आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रविवारी वलगाव तालुक्यातील नया अकोला येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सुरूवातीला अकोला ग्रामपंचायतीच्या परिसरात व मंदिराच्या आवारात वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी किरण गित्ते, उपजिल्हाधिकारी काळे, सामाजिक वनिकरणाचे उपसंचालक पी.डी. मसराम, सहायक संचालक थोरात, तहसीलदार सुरेश बगळे, पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी अनिल भटकर, गटविकास अधिकारी कापडे, तलाठी कपीले, पंचायत समिती सभापती आशिष धर्माळे उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री म्हणाले, येत्या १ जुलै रोजी राज्यात दोन कोटी वृक्ष लावण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम शासनाने हाती घेतला आहे. जिल्ह्यात १० कोटी झाडे लावण्याचा मानस आहे.गावकऱ्यांनी व शेतकऱ्यांनी एमआरजीएसच्या माध्यमातून गटांची निर्मिती करून गावात व शेतातील बंधाऱ्यांवर दीर्घकाळ टीकणारी झाडे लावावीत. राज्यात ३ ते ९ जून या कालावधीत पर्यावरण सप्ताह साजरा करण्यात येतो. या सप्ताहात जिल्ह्यात सुमारे १० कोटी झाडे लावली जातील. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात पाच गावांची निवड करण्यात येणार आहे. गावकऱ्यांना व शेतकऱ्यांना आवश्यक असलेली झाडे वनविभाग व सामाजिक वनिकरण विभागाद्वारे मागणीनुसार पुरविण्यात येतील, अशी माहिती मान्यवरांनी दिली. (प्रतिनिधी)