शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

कधी गाव मुक्काम, कधी झाडाखालीच सभा

By admin | Updated: June 4, 2017 00:05 IST

बळीराज्याच्या कर्जमुक्तीसाठी शाश्वत शेती, समृद्ध शेतकरी अंतर्गत शिवार संवाद सभा, ही पंडित दिनदयाल उपाध्याय यांची संकल्पना,...

शेतकऱ्याशी थेट संवाद : पालकमंत्र्यांच्या शिवार सभेची ७७ गावात उपलब्धीलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बळीराज्याच्या कर्जमुक्तीसाठी शाश्वत शेती, समृद्ध शेतकरी अंतर्गत शिवार संवाद सभा, ही पंडित दिनदयाल उपाध्याय यांची संकल्पना, लोकप्रतिनिधी व मंत्र्यांनी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेणे व त्याचा जागीच निपटारा करणे, हे या संकल्पनेला अभिप्रेत, आदी स्वप्नवत वाटणाऱ्या बाबींना जिल्ह्यात मूर्तरूप मिळाले आहे. जिल्ह्याचे पालक या नात्याने ना.प्रवीण पोटे यांनी आठवडाभरात तब्बल ७७ गावांना भेटी देऊन त्यांच्याशी संवाद साधला. ही या अभियानाची उपलब्धी होय.भर दुपारी झाडाखाली, कधी खाटेवर, तर कधी सतरंजीवर बैठक घेऊन शेतकरी व मंत्र्यामधला संवाद झाला. श्रमाला प्रतिष्ठा मिळावी, शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावा, यासाठी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासन योजनेचा लाभ मिळावा, यासाठी एक जागृत व जबाबदार मंत्री म्हणून पालकमंत्र्यांची धडपड त्यांच्या दौऱ्यात अनुभवास आली. सर्वसामान्य नागरिकांच्या लोकप्रतिनीधी व शासनाकडून खूप काही अपेक्षा आहेत. आपल्या समस्या, अडचणी समजून घेण्यासाठी खुद्द मुख्यमंत्र्यांनी तुमच्याकडे पाठविले आहे, या वाक्यापासून ना.पोटे संवाद साधण्यास सुरुवात करतात. काही लवाजमा नाही. व्यासपीठ, मंडप आदी काही नाही. सावलीचा आधार घेत सतरंजीवर बैठक मारलेले पालकमंत्री व उपस्थितांमध्ये मग सुरक्षित अंतराची बाधा राहत नाही व भीड चेपून थेट संवाद होतो. हेच या अभियानाच्या यशस्वीतेचे गमक असल्याचे दिसून आले. राज्यात गेल्या ७० वर्षांत अशा प्रकारचा संवाद प्रथमच होत असल्याचे यावेळी शेतकऱ्यांनी बोलतांना सांगीतले.व जिल्ह्याचा पालक म्हणून हे आपले कर्तव्य आहे व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात शाश्र्वत शेतीव्दारे शेतकरी समृद्धीचा वसा शासनाने घेतला असल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिली. मागील तीन वर्षांत राज्य शासनाने समाजातील शेवटचा घटक डोळ्यासमोर ठेवून धाडसाने निर्णय घेतले आहे. अंमलबजावणीमध्ये जर प्रशासनातील एखादा अधिकारी आपली जबाबदारी नीट पाळत नसेल त्याला वठणीवर आनन्यासाठी आपण समर्थ आहोत. कुठलाच संकोच न बाळगता आपणाकडे थेट तक्रार करावी, असे आवाहन त्यांनी केले. कधी प्रेमाने तर कधी रागावून. मात्र, थेट संवाद संकल्पनेला कुठेही बाधा न येऊ देता पालकमंत्र्यांनी आठवडाभरात तब्बल ७७ गावांमध्ये थेट शिवार संवाद संकल्पना यशस्वीरीत्या राबविली. नागरिकदेखील प्रथमच असे अभियान अनुभवत असल्याने गावागावांत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.८.५० लाख क्विंटल तुरीची शासकीय खरेदी जिल्ह्यात यंदा तुरीचे भरघोस उत्पादन झाले. खुल्या बाजारात भाव कमी असल्याने केंद्र व राज्य शासनाने जिल्ह्याच्या उत्पादकतेच्या तुलनेत ५० टक्क्यांवर तूर खरेदी केली. सध्या ८.५० लाख क्विंटल तुरीची खरेदी झाली. या केंद्रांना पुन्हा १० जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. शेतकऱ्यांजवळील सर्व तूर शासन खरेदी करणार आहे. यापूर्वीच्या सरकारने कधीच एवढी तूर खरेदी केली नव्हती, असे पालकमंत्र्यांनी सांगताच शेतकऱ्यांनीदेखील दुजोरा दिला.स्थानिक कर्मचाऱ्यांवर नागरिकांचा रोषगावपातळीवरील प्रशासनाचा दुवा म्हणून काम करणाऱ्या ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहाय्यकांविरुद्ध नागरिकांनी गाऱ्हाणी मांडली. दुजाभाव करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. यावर पालकमंत्र्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना खडे बोल सुनावले. काही गावांत हे कर्मचारी केव्हाही धाऊन येतात, याची ग्वाहीदेखील नागरिकांनी दिली.