शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांच्या पत्रानंतरही वनविभागाचे बिबट्याला पाठबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:10 IST

मुख्य वनसंरक्षकांची तारांबळ, मुलाच्या पत्राचे वडिलांना उत्तर अनिल कडू परतवाडा : मांजरखेड कसबा शिवारात धुमाकूळ घालत असलेल्या बिबट्याचा बंदोबस्त ...

मुख्य वनसंरक्षकांची तारांबळ, मुलाच्या पत्राचे वडिलांना उत्तर

अनिल कडू

परतवाडा : मांजरखेड कसबा शिवारात धुमाकूळ घालत असलेल्या बिबट्याचा बंदोबस्त करावा. त्याला तातडीने पकडण्याची व्यवस्था करावी, या मागणीचे पत्र आमदार प्रताप अडसड यांनी वनविभागाकडे ५ मार्चला पत्र दिले होते. पण, या पत्राकडे दुर्लक्ष करून वनविभागाने चक्क त्या बिबट्यालाच पाठबळ दिले. यातूनच २९ मे रोजी दुपारी त्या बिबट्याने एका गुराख्यावर हल्ला चढविला. यात तो गंभीर जखमी झाला.

शेतकऱ्यांना या बिबट्याचे दर्शन होत आहे. यामु‌ळे मजुरांचीही शेतात ये-जा बंद झाली असून, गावकरी संतप्त आहेत, असे या ५ मार्चच्या पत्रात आमदार प्रताप अडसड यांनी म्हटले. पण, या पत्राकडे वनविभागाने दुर्लक्ष केले. बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न न करता, उलट त्यालाच पाठबळ दिले. यात पाळीव जनावरांवर हल्ला चढविणारा हा बिबट्या आता गुराख्यासह गावकऱ्यांच्या जिवावर उठला आहे.

दरम्यान, आमदार प्रताप अडसड यांच्या या पत्राची अमरावती प्रादेशिक वनविभागाचे मुख्य वनसंरक्षकांनी दखल घेतली. उपवनसंरक्षकांना ९ मार्चच्या पत्राद्वारे निर्देश दिले. आमदार प्रताप अडसड यांच्या पत्राच्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही करून त्याबाबतचा अनुपालन अहवाल विनाविलंब सादर करण्यास सुचविले. पण, मुख्य वनसंरक्षकांच्या निर्देशांनकडे संबंधित वनअधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले.

उत्तर अरुण अडसडांना

मुख्य वनसंरक्षकांची हे निर्देश देताना तारांबळ उडाल्याचे त्यांच्या पत्रावरून दिसून आले आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्याबाबत पत्र आमदार प्रताप अडसड यांनी दिले. पण, या पत्राचे उत्तर अरुण अडसड यांच्या नावे पाठविले गेले. त्यात त्यांचा ‘विधानसभा सदस्य’ असा उल्लेखही केला गेला. प्रताप अडसड हे अरुण अडसड यांचे चिरंजीव. यात मुलाच्या पत्राला उत्तर वडिलांना पाठविण्याचा विक्रमही वनविभागाकडून आपल्या दप्तरी नोंदविल्या गेला.