शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

जीवनावश्यक दुकानांना आता सकाळी ७ ते सकाळी ११ पर्यंतच मुभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:13 IST

अमरावती : कोरोना प्रतिबंधासाठी संचारबंदीत निर्बंध अधिक कडक करण्यात आले असून, जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांची वेळ आता सकाळी ७ ...

अमरावती : कोरोना प्रतिबंधासाठी संचारबंदीत निर्बंध अधिक कडक करण्यात आले असून, जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांची वेळ आता सकाळी ७ ते ११ अशी करण्यात आली आहे. तसा आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी मंगळवारी जारी केला.

आदेशानुसार, सर्व प्रकारच्या जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवांतर्गत किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, दूध विक्री केंद्रे, डेअरी, बेकरी, मिठाई, सर्व प्रकारची खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने (चिकन, मटण, पोल्ट्री, मासे व अंड्यांच्या दुकानांसह), कृषी अवजारे व कृषी उत्पादने (बी-बियाणे, रासायनिक खते, कृषी अवजारे) पाळीव प्राणी, खाद्यपदार्थाची दुकाने, पावसाळ्यासाठी करावयाच्या कामाकरिता आवश्यक असलेली सर्व प्रकारची दुकाने ही सकाळी ७ ते सकाळी ११ पर्यंत खुली राहतील. याशिवाय उपाहारगृहांना घरपोच सेवेची मुभा देण्यात आली आहे. यामध्ये सर्व प्रकारचे हॉटेल, बार, उपाहारगृहे, खाणावळी यांना घरपोच सेवा देण्यासाठी सायंकाळी ७ वाजेपर्यंतच परवानगी असल्याचे आदेशात स्पष्ट केले आहे.

बॉक्स

आदेशात यांना वगळले

सर्व प्रकारची रुग्णालये, उपचार केंद्रे, लसीकरण केंद्रे, दवाखाने, वैद्यकीय व विमा कार्यालये, औषधी दुकाने, औषधी निर्मिती कंपन्या, वैद्यकीय उत्पादन व वितरणातील विक्रेते यांची वाहतूक व त्यासंबंधीची पुरवठा साखळी, औषधालये, नर्सिंग होम, वैद्यकीय प्रयोगशाळा, रुग्णवाहिका तसेच इतर वैद्यकीय आरोग्य सुविधा, सेवा, सॅनिटायझर, मास्क, वैद्यकीय उपकरणे व त्याबाबत कच्चा माल पुरविणारे उत्पादक व वितरक, पेट्रोल पंप व पेट्रोलियम पदार्थासंबंधी उत्पादने, एटीएम केंद्रे यामधून वगळण्यात येत आहेत. जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा, कृषिसेवासंबंधी मालवाहतुकीसाठी सदरचे निर्बंध लागू असणार नाहीत. ही वाहतूक पूर्णपणे सुरू राहील.