शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

घरकूल लाभार्थ्यांना मिळावा समान वाढीव निधी

By admin | Updated: March 4, 2016 00:18 IST

शासनाच्या एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत चांदूरबाजार शहरातील पूर्ण करण्यात आलेल्या..

मागणी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले निवेदनसुमित हरकुट चांदूरबाजारशासनाच्या एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत चांदूरबाजार शहरातील पूर्ण करण्यात आलेल्या व शिल्लक असलेल्या घरकुलाच्या लाभार्थींना शासनाचे प्राप्त वाढीव निधीचा समान लाभ द्यावा, अशी मागणी पालिकेचे उपाध्यक्ष मुजफ्फर हुसैन यांनी केली आहे. शासनाच्या एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत शहरातील विविध झोपडपट्ट्यांचे सन २००८-०९ मध्ये सर्वेक्षण करून एकूण ९८५ प्राथमिक लाभार्थींची यादी तयार करण्यात आली व एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यातील ९८५ घरकुलांसह रकमेच्या प्रस्तावावर केंद्र शासनाकडून १६ डिसेंबर २००८ रोजी मंजुरी प्राप्त झाली आहे. त्या अनुषंगाने २८ जुलै २०११ रोजी प्रत्यक्ष लाभार्थींमार्फत घरकूल बांधकामाकरिता १.२५ लक्ष प्रती घरकूल (२७० चौ. फूट याप्रमाणे) बांधकामाची परवानगी दिली. त्यानुसार प्राप्त निधीमधून एकूण ९८५ पैकी ३२१ घरकुलांचे बांधकाम मार्च २०१३ मध्ये पूर्ण करण्यात आले. परंतु या निधीत घरकुलाचे बांधकाम पूर्ण होत नसल्याने नगरपालिकेने १५ एप्रिल २०१४ ला शासनाकडून उर्वरित ६६४ घरकुलांचे बांधकाम करण्याकरिता वाढीव निधी मंजूर करण्याची विनंती करण्यात आली. त्यानुसार एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत प्रती घरकूल घटकाकरिता कमाल किंमत २ लक्षप्रमाणे निधी मंजूर करण्यात आला. त्यानुसार शासनाकडून ६६४ घरकुलाकरिता एकूण ४.८० कोटी रुपयांचा वाढीव निधी मंजूर करण्यात आला आहे. शहरातील एकूण ९८५ घरकुलांपैकी पूर्ण करण्यात आलेल्या ३२१ घरकुलाच्या लाभार्थिंनी घरकुलासाठी मंजूर केलेल्या १ लक्ष २५ हजार या रकमेमध्ये घरकुलाचे बांधकाम पूर्ण होत नसल्याने अनेकांनी स्वत: खर्च करून त्यांचे घरकुलाचे वाढीव बांधकाम पूर्ण केले. उर्वरित ६६४ घरकुलांकरिता शासनाच्या वाढीव निधीअंतर्गत सर्व ९८५ लाभार्थिंना समान निधी मिळावा, अशी मागणी केली आहे.