शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

अर्जुननगरात अतिक्रमण हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2016 00:15 IST

गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अर्जुननगर येथील अतिक्रमित असलेले पंचशील ध्वज हटविण्याची ..

लोकायुक्तांचे आदेश : महापालिकेची सोमवारी पहाटे ५ वाजता कारवाईअमरावती : गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अर्जुननगर येथील अतिक्रमित असलेले पंचशील ध्वज हटविण्याची कारवाई सोमवारी पहाटे वाच वाजताच्या सुमारास महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाने पोलीस बंदोबस्तात केली. ही कारवाई लोकायुक्तांच्या आदेशानुसार करण्यात आली असून या कारवाईला बौद्ध समाज बांधवांनी निषेध केला.आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या आदेशानुसार अतिक्रमण निर्मूलन विभागाने काही वर्षांपासून अतिक्रमीत असलेले पंचशील ध्वज हटविण्याची कारवाई करण्यात आली आहे. हा पंचशील ध्वज हटविताना प्रचंड पोलीस ताफा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला होता. परिसरात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता यापूर्वीच आयुक्त गुडेवार यांनी पोलीस विभागाला पत्राद्वारे कळविली होती. त्यानुसार गाडगेनगर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त स्वत: घटनास्थळीे अतिक्रमीत हटविताना हजर होते. लोकायुक्तांच्या आदेशानुसार महापालिका प्रशासनाने अतिक्रमीत धार्मिक स्थळ हटविण्याची कारवाई केली आहे. या कारवाई दरम्यान सहायक संचालक नगररचना सुरेंद्र कांबळे, सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे, जागा निरिक्षक गणेश कुत्तरमारे, मनीष हिरोडे, प्रितम रामटेके यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.आयुक्तांच्या दालनात महिलांचा ठिय्यायेथील अर्जुननगरातील अतिक्रमीत पंचशील ध्वज हटविण्यात आल्यानंतर परिसरातील महिलांनी आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या दालनात सोमवारी ठिय्या मांडला. एकाच समाजाचे धार्मिक अतिक्रमण हटविण्याबाबत महिलांनी आयुक्तांसोबत चर्चा करताना जाब विचारला. यावेळी नगरसेवक प्रदीप दंदे, दीपक पाटील, सुदाम बोरकर, कैलास मोरे, सुनील गजभिये यांनी आक्रमक भूमिका घेत महापालिका कारवाईवर संताप व्यक्त केला.